Ticker

6/recent/ticker-posts

टाकळी अमिया येथे संत सावतामाळी आणि संत नामदेव महाराज संयुक्त पुण्यतिथी सोहळा

आष्टी तालुक्यातील टाकळी अमिया येथे संत शिरोमणी सावतामाळी आणि संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या संयुक्त पुण्यातिथीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायीक पारायण सोहळा दि.१० ते १७ जुलै २०२३ या कालावधीत होत आहे. या सप्ताहात काकडा भजन, ग्रंथवाचन, संतकथा,हरिपाठ,हरिकीर्तन व हरिजागर होणार आहे.सप्ताहात ह.भ.प.दादामहाराज चांगुणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह संपन्न होत आहे. या सप्ताहात ह.भ.प. निवृत्तीदादा बोडखे महाराज,ह.भ.प. गणेशनंद चेडे महाराज, ,ह.भ.प.संतोष महाराज मोरे,ह.भ.प.श्रीहरि महाराज चांगुणे,ह.भ.प. रक्टाटे महाराज ,ह.भ.प. राऊतदादा महाराज, ह.भ.प.दादा महाराज चांगुणे,सोमवार दि.१७ जुलै रोजी सकाळी ९ ते ११ या वेळात ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली सुडके महाराज यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. महाप्रसादाची महापंगत के.विठ्ठलराव ससाणे यांच्या स्मरणार्थ सरपंच सावताशेठ ससाणे यांच्यावतीने देण्यात येणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या