मराठा सेवा संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीची बैठक दि.८ आणि ९ जुलै रोजी छत्रपती
संभाजीनगर येथे संपन्न झाली.यावेळी राज्य जलसंपदा विभाग औरंगाबाद (छत्रपती
संभाजीनगर) या विभागाचे मुख्य अभियंता शिवश्री इंजि.विजय घोगरे यांची सलग
तिसऱ्यांदा राज्य अध्यक्षपदी निवड झाली. यावेळी मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष
शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर,माजी आ.शिवमती रेखाताई खेडेकर,राष्ट्रीय अध्यक्ष कामराज
पवार आदी मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले.त्यांनी यावेळी इंजि.विजय घोगरे यांचे
अभिनंदनही केले.माजी जिल्हाधिकारी तथा मराठा सेवा संघाचे संस्थापक महासचिव
निर्मलकुमार देशमुख यांनी इंजि.विजय घोगरे यांचा सत्कार केला. परधानाध्यापकत्यावेळी मराठा सेवा
संघाचे माजी प्रदेशाध्यक्ष नेताजी गोरे,कार्यकारी अध्यक्ष अर्जुनराव तनपुरे, राज्य
प्रवक्ते प्रा.गंगाधर बनबरे,युवा नेतृत्व सौरभ खेडेकर,इंजि.तानाजी जंजिरे हे
मान्यवर उपस्थित होते. नवनिर्वाचित अध्यक्ष इंजि.विजय घोगरे यांचे राज्यभर सर्वत्र
अभिनंदन होत आहे.
0 टिप्पण्या