
२०२३ साठी दिलेल्या कालावधीमध्ये आपली " ई- पीक पाहणी " नोंदणी पूर्ण करावी असे
आवाहन बीड जिल्हाधिकारी श्रीमती दीपा मुधोळ - मुंडे यांनी प्रेस नोटद्वारे केले
आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी ई- पीक पाहणी मोबाईल
ॲप्स साहाय्याने तलाठ्याकडे न जाता स्वतःच्या मोबाईलवरून आपल्या सातबारावर विविध
पिकांची नोंदणी करता येणे शक्य झाले आहे महसूल विभागाचा ई -पीक पाहणी प्रकल्प १५
ऑगस्ट २०२१ पासून राज्यभर राबविण्यात येत आहे या पीक पाहणी ॲपच्या माध्यमातून मागील
रब्बी हंगामामध्ये बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी १०० टक्के ही पीक पाहणी करून आपल्या
पिकाची नोंदणी करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेतलेला आहे त्यामुळे ही पीक
पाहणी १०० टक्के करावयाचे आहे मोबाईल ॲपद्वारे पीक पाहणी करण्यासाठी १ जुलै २०२०
पासून सुरुवात करण्यात आलेली आहे. बीड जिल्ह्यातील सर्व शेतकरी बंधू भगिनी, सरपंच,
पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, कोतवाल स्वस्त धान्य दुकानदार,
महात्मा गांधी तंटामुक्ती, अध्यक्ष बचत गट प्रतिनिधी, सहकारी संस्थांचे अध्यक्ष आणि
सचिव, अध्यक्ष शेतकरी दूध उत्पादक संस्था, पाणी फाउंडेशन गट, पोखरा प्रतिनिधी,
ग्राम रोजगार सेवक, तांत्रिक सहाय्यक, बँक प्रतिनिधी, शाळा व कॉलेजचे विद्यार्थी,
प्रगतिशील शेतकरी सर्व ग्रामपंचायत, समिती पंचायत समिती, जिल्हा परिषदेचे सदस्य,
मीडिया प्रतिनिधी, आपले सरकार सेवा केंद्रचालक, यांनी शासनाच्या या महत्त्वाकांशी
असलेल्या " ई-पीक पाहणी " प्रकल्पात सहभाग घेऊन शेतकऱ्यांना ई- पीक पाहणी
करण्यासाठी प्रोत्साहित करावे . ही ई -पीक पाहणी करताना काही शंका व अडचणी आल्यास..
बीड तालुक्यासाठी ८८०५ २४७७७३ परळीसाठी ९३२६००४५८९ माजलगाव धारूर आणि वडवणीसाठी
९८९०४५६०६५ गेवराई व शिरूर तालुक्यासाठी ९७६३४९८९५५ आष्टी व पाटोदा साठी ८७६६७७५४५२
आणि केस अंबाजोगाईसाठी ९०९६५९१९९१ या हेल्प डेस्क क्रमांकावर संपर्क करून आपल्या
अडचणीचे निरसन करावे प्रमाणे बीड जिल्ह्यातील सध्या खरीप हंगामाची "ई- पीक पाहणी,"
१०० टक्के पूर्ण करण्यासाठी विविध घटकांनी सहभाग घ्यावा तसेच व्हाट्सअप ग्रुपच्या
माध्यमातून सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी यांनी ई-पीक पाहणी साठी योगदान द्यावे..
असे आवाहनही जिल्हाधिकारी श्रीमती दीपा मुधोळ- मुंडे यांनी केले आहे.
0 टिप्पण्या