
पावसाळा हंगामात प्रामुख्याने जून
ते सप्टेंबर या कालावधीत गोगलगाय सोयाबीन,कापुस,पपई,केळी,वाल, दोडका काकडी या सारखी
वेलवर्गीय पिके, वांगी,भेंडी,मिरची,कोबी, फुलकोबी व सर्व प्रकारच्या पालेभाज्या, ऊस
रोपवाटीकेतील रोपे, ऊगवून आलेली नवती पाने फुले कंद यामध्ये खाण्यासाठी छिद्र
करतात. बीयापासून अंकुरीत कोवळे कोंब यांना कुरतडून खातात.यामुळे उपद्रव होऊन तसेच
कुरतडलेल्या ठिकाणी बुरशीचा प्रार्दुभाव होऊन लहान रोपे मरतात. यामुळे उत्पादनात १०
ते १५ टक्के घट येते.शंखी (Snail) तसेच शेंबडी (Slugs) हे मोलुस्का या वर्गातील
किडी आहेत.शंखी गोगलगायीच्या अंगावर कवच असते तर शेंबडीच्या (Slugs ) अंगावर कवच
नसते. शंखीच्या पाठीवर एक ते दिड इंच लांबीचे गोलाकार कवच असते. बहुतांशी शंखी
गर्द,करडया,फिक्कट किंवा हिरव्या काळपट रंगाच्या असतात.शंखी गोगलगाय आफ्रिकन जॉइन्ट
स्नेल या नावाने परिचित असून तिचे शास्त्रीय नाव अचेटिना फुलिका (Achatina fulica)
आहे. ती निरनिराळया ५०० वनस्पती खाऊन उपजिविका करते.गोगलगाय किडीस पाय नसतात त्या
सरपटत चालतात व चालतांना सतत शेंबडासारखा चिकट स्त्राव सोडते,त्यामुळे त्यांना पुढे
सरकणे सोपे जाते.ही किड दिवसा ती दगड, पालापाचोळयाच्या खाली, झाडाच्या
खोडाभोवतालच्या दाट गवतात, जमिनीला लागून झाडाच्या असलेल्या फांद्या खाली आदि
ठिकाणी लपते तर रात्रीच्या वेळी सक्रीय राहून पिकाचे नुकसान करते. प्रसार
----------- या किडीचा प्रसार शेतामध्ये वापरात असणारी अवजारे, बैलगाडी,
यंत्रसामग्री, ट्रॅक्टर ट्रॉली, तसेच अन्य साधनांमधुन होतो. तसेच ते वाहतुकीसाठी
वापरण्यात येणारे प्लास्टिकचे ट्रे, शेणखत, विटा, माती, वाळु, कलम रोपे, बेणे, ऊस,
मास आदीमार्फतही होतो. गोगलगायी सर्वसाधारणपणे अन्नपाण्याशिवाय ४ ते ६ महिने जिवंत
राहु. जीवनक्रम -------------- पुर्ण वाढ झालेल्या शंखीची लांबी १५ ते १७.५ सें.मी.
असते. सर्व गोगलगायी हया बहुलिंगी असून त्या अंडी देण्यास सक्षम असतात.अंडी
गोलाकृती व पांढऱ्या रंगाची साबुदान्यासारखी असतात. एक मादी सरासरी ७० ते १०० अंडी
एकाचवेळी पिकाच्या खोडाशेजारी किंवा मुळाजवळ भुसभुशीत मातीत ३ ते ५ सें.मी. खोलीचे
छिद्र करून अंडी घालते. अशाप्रकारे एक मादी वर्षातून ६ वेळा अंडी देते.या किडीची एक
वर्षात पूर्ण वाढ होते. गोगलगाय तीन ते चार दिवसात १०० ते ४०० अंडी देते.अंडी
देण्यासाठी मिलनाची आवश्यकता नसते. मिलनासाठी ते योग्य साथीदाराची निवड करून
एकमेकांशी सहा ते आठ दिवस मिलन करतात. सर्वसाधारण १७ दिवसापर्यत अंडयातुन पिल्ले
बाहेर येतात. त्यांची वाढ पुर्ण होण्यास आठ महिने ते एक वर्ष कालावधी लागतो.या
काळात ही पिल्ले पिकांचे नुकसान करतात.शंखी रात्रीच्या वेळी कार्यक्षम असते.दिवसा
ती सावलीमध्ये पानाखाली किंवा ओल्या जागी आढळते.शंखी अती थंड किंवा अती उष्ण
हवामानात आपल्या कवचाचे तोंड पातळ पापुद्रयाने बंद करून झाडाला,भिंतीला चिटकून
सुप्तावस्थेत जाते. गोगलगाय नियंत्रण उपाय योजना सामूहिक मशागतीचे नियंत्रण
-------------- उन्हाळ्यात खोल नांगरट करावी,शेतावरील बांध स्वच्छ ठेवावेत,
शेताभोवती २ मी.पट्टयात राख,मोरचूद व चुना यांचे मिश्रण पसरावे,शेतामध्ये ७ ते १०
मीटरवर वाळलेले गवत,पपईचा पाला,गोणपाट,कुजलेली लाकडे, भाजीपाला यांचे ढीग ठेवावेत,
सुर्यादयापूर्वी रात्रीनंतर गोगलगाय या ठीगाखाली आश्रय घेतात. या ढिगाखालील गोगलगाय
मीठाच्या किंवा साबणाच्या पाण्यात टाकून नष्ट कराव्यात,फळबागेतील उपद्रव टाळणेसाठी
१० टक्के बोर्डोपेस्ट बुंध्याला लावावी,लहान गोगलगाय नियंत्रणासाठी मीठ ५ टक्के
द्रावण फवारणीची शिफारस आहे. जैविक उपाय --------------------- गोगलगायींच्या
नैसर्गिक शत्रूंचे संवर्धन करावे. उदा. कोंबडी, बदक,पाच टक्के सोपनटचे ( शिकाकाई फळ
) द्रावण करून फवारणी केल्यास नियंत्रण होते. रासायनिक उपाय ---------------------
कापूस, सोयाबीन पीकावरील गोगलगाय नियंत्रणासाठी स्नेल किल (मेटाल्डिहाईड) 2 किलो
प्रति एकर + 10 लि. पाणी + 2 किलो गुळ + 25 ग्रॅम यीस्ट + 50 किलो गव्हाचे काड 10 -
12 तास भिजत घालून त्यामध्ये 50 ग्राम (अरेवा (थायामेथोक्साम) मिश्रण करून पट्टयात
छोटे छोटे ढीग केल्यास प्रभावी नियंत्रण करता येते. मेटाल्डिहाईड -2.5 टक्के
भुकटीचा ( 50 ते 80) ग्रेम प्रती फुट वापर गोगलगायच्या मार्गात / पिकाच्या दोन ओळीत
किंवा प्रादुर्भावीत क्षेत्रात वापर केल्यास गोगलगायीचे चांगले नियंत्रण करता येते.
प्रा.एल.एस. मिसाळ
(कृषी किटकशास्र विभाग छत्रपती
शाहु फुले आंबेडकर कृषी महाविद्यालय आष्टी)
--------------------
0 टिप्पण्या