राज्य शासनाकडून सर्वसामान्य
नागरिकांना आरोग्यबाबत येणा-या समस्या त्याचबरोबर
त्यांची असलेली आर्थिक अडचणीमुळे आरोग्यसेवेपासून
वंचित राहत असलेल्या नागरिकांना राज्य सरकारच्या
आयुष्यमान भारत या आरोग्यसेवेत मोफत लाभ मिळावा
यासाठी आर्थिक दुर्बल असलेल्या नागरिकांचे हेल्थ कार्ड
काढण्याचा कार्यक्रम राबविला
जात असून यासाठी आता आशा स्वंयसेविका
जनसामान्यांच्या दारी येवून कार्ड काढणार आहेत.
आष्टी तालुक्यातील नागरिकांनी कार्ड काढून घेण्याचा
लाभ घ्यावा असे आवाहन टाकळसिंग प्राथमिक
आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.नितीन मोरे
यांनी केले आहे.
राज्य सरकारच्या आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड
या कार्यक्रमांतर्गत यापुढे आपल्या आरोग्य विषयक
माहिती आता ऑनलाईन पाहायला मिळणार आहे.
यानंतर रुग्णालयात जाताना नागरीकांना आपल्या
आजाराबाबत माहिती असलेली फाईल घेऊन जायची
गरज पडणार नाही.आपण ज्या रुग्णालयात जाणार
आहात,त्याठिकाणी या आभा हेल्थ कार्डचा १४ अंकी
क्रमांक टाकल्यावर रुग्णासंदर्भात पूर्ण माहिती
संबंधित वैद्यकीय तज्ञांना दिसणार आहे.
प्राप्त माहिती संबंधित डॉक्टर त्याच फाईलमध्ये
आ
नोंद करू शकतात.यापुढे रुग्णालयात
जाताना कुठलाही शारिरीक आजाराची माहिती
फाईल किंवा इतर कागदपत्रे सांभाळून ठेवण्याची
गरज नाही आदी माहिती या आयुष्यमान भारत
हेल्थ कार्डमार्फत ऑनलाईन दिसणार आहे.
0 टिप्पण्या