उत्तम बोडखे,आष्टी.
------------------------------
लहान वयातील मुलांच्या विविध अवघड शस्त्रक्रिया करणे हे
अत्यंत कठीण काम असते. अशातच एका सर्वसामान्य कुटुंबातील
बालकाला लिंग विषयक दुर्मिळ शस्त्रक्रिया यशस्वी करून डॉक्टरांनी
जीवदान दिल्याने त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.अहमदनगर
शहरातील केडगाव येथील एका बालकाला अफालिया (पेनाईल
अजेनेसिस) या अतिशय दुर्मिळ आजाराने ग्रासले होते. हा आजार १:३००,००,००० (तीन कोटी पैकी एका ) बालकाला होतो.
आजतागायत जगभरात फक्त ८० रुग्णचं आढळले आहेत.या
आजारात बालकाला जन्म जात लिंग व अंडकोष नसतात त्यामुळे
मुलगा की मुलगी असे ठरवणे अवघड जाते.पूर्वी या आजारात सर्व
बालकांना शस्त्रक्रिया करून मुलगी बनवले जात होते परंतु या
बालकाच्या तपासण्या केल्या असता हार्मोन्सची कमतरता आढळून
आली.४६ xy असे गुणसूत्राचे रिपोर्ट आले.हार्मोन्सचे डोस देऊन
हार्मोन्स नियंत्रित करण्यात आली.बालकांमधील लिंगाची त्वचा व
अंडकोशाची त्वचा हे दिसू लागल्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय
घेण्यात आला. सर्व तपासण्या झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगरच्या
रामकृष्ण हॉस्पिटलमध्ये स्क्रोटल रोटेशन फ्लॅप व बाय लॅटरल
ऑर्किडोपेकसी ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली. त्यामुळे
या बालकाला मुलगा म्हणून एक नवीन व चांगलं आयुष्य प्रदान
करण्यात डॉ.संदीप हंबर्डे यांना यश आले आहे.
यशस्वी केल्याबद्दल त्यांना डॉ.अब्दुल कलाम एक्सीलेंस अवार्ड व
महाराष्ट्र आरोग्य भूषण पुरस्काराने यापूर्वी गौरवलेले आहे.अशा
प्रकारची दुर्मिळ शस्त्रक्रिया यशस्वी केल्याबद्दल वैद्यकीय क्षेत्रात
डॉ.संदीप हंबर्डे यांचं कौतुक होत आहे.आजही समाजाचा डॉक्टरावर
इतकाच विश्वास आहे काही अपवादात्मक डॉक्टर सोडले तर बहुतांश डॉक्टरांनी आपल्या बुद्धी क्षमतेचा वापर करून अनेक अवघड शस्त्रक्रिया यशस्वी करत जीवदान देण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे आजची ही
अशा प्रकारची शस्त्रक्रिया बालकावर करून त्या कुटुंबातील सर्वांचा
आनंद द्विगुणित झाला आहे.


0 टिप्पण्या