Ticker

6/recent/ticker-posts

केळसांगवी येथील शेतकऱ्यांला सापडली लढाऊ विमानाची मिशाईलची बुलेट ....


आष्टी तालुक्यातील रुटी इमनगाव प्रकल्पातुन केळसांगवी येथे पाईपलाईन करत असताना एका शेतकऱ्याला मिसाइलची गोळी (बुलेट) सापडली असून ती आष्टी पोलीसाकडे सुपूर्द करण्यात आली आहे.याबाबत अधिक माहिती अशी की,केळसांगवी येथे जलजीवन मिशन अंतर्गत पाईपलाईनचे काम चालू असताना लढाऊ मिशाईलची गोळी (बुलेट) शेतकरी मजूर दादासाहेब साहेबराव गायकवाड यांना सापडली. काही दिवसापूर्वी रुटी इमनगाव प्रकल्पात लढाऊ विमानाचा अपघात झाला होता त्या लढाऊ विमानाचा हे मिशाईलची बुलेट असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. या बुलेटचे ६ किलो वजन आहे.मंगळवारी शेतकरी हे पाईपलाईनचे काम करत असताना त्यांना लढाऊ विमानातील मिशाईलची गोळी (बुलेट) सापडली ती बुलेट आष्टी पोलिसांकडे सुपूर्द करताना केळसांगवीचे माजी सरपंच गंगाधर पडोळे,बिभीसेन कोंडे,प्रकाश पवार ,महादेव कोंडे,दादा शिंदे,अंगद पडोळे,आनंद बोराडे,शरद घुले,बाबासाहेब पाटील,




,फौजी तुकाराम पडोळे,फौजी गणेश पवळ,फौजी संदीप पानतावणे आदी ग्रामस्थ हे उपस्थित होते.या बुलेटची बीड बॉम्ब शोधक व नाशक पथकाने  तपासणी करून पुढील तपासणी साठी ही बुलेट पुणे येथील सैनिकी विभागाकडे सुपूर्द करणार असल्याची माहिती आष्टी पोलिसांनी दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या