सर्वसामान्यांना कळेल असे रूप भगवंताने आपल्यासमोर धारण केले भगवंत हा भक्तीचा भुकेचा असून समता बंधुत्व ही मूल्य म्हणजेच ईश्वर असल्याचे सांगून चंद्र सूर्य असेपर्यंत परमेश्वराचे, संतांचे विचार अमर राहतील असे प्रतिपादन अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा ज्येष्ठ किर्तनकार ह.भ.प.प्रकाश महाराज बोधले यांनी केले.आष्टी येथील श्री संत ज्ञानेश्वर माऊली महाराज चाकरवाडीकर यांच्या २३ व्या. पुण्यस्मरणानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त संत नामदेव महाराजांच्या सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी चरित्र कथा व अखंड हरिनाम सप्ताहातील काल्याचे कीर्तन प्रसंगी अ.भा.वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प.प्रकाश महाराज बोधले बोलत होते.यावेळी आ.सुरेश धस,आ.बाळासाहेब आजबे, माजी आ.भीमराव धोंडे,माजी आ.साहेबराव दरेकर,विजय गोल्हार, डॉ.शिवाजी राऊत,सतिषआबा शिंदे,आण्णासाहेब चौधरी,आदिनाथ सानप, डॉ.मधुकर हंबर्डे, दिनकरराव तांदळे, निवृत्ती बोडखे,श्रीहरी पूरी,आदिनाथ दानवे,डोरले महाराज,बलभीम सुंबरे, सरपंच अशोक मुळे,नगराध्यक्ष रंगनाथ धोंडे, दत्तात्रय निंबाळकर,राजेंद्र धोंडे, प्रफुल्ल सहस्रबुद्धे, उत्तम बोडखे, शरद रेडकर ,शरद तळेकर आदि सामाजिक, राजकीय,धार्मिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रारंभी संतांच्या विविध प्रतिममांना अभिवादन करून वारकऱ्यांच्या प्रचंड उत्साहपूर्ण साथ संगतीचे कौतुक करत ह.भ.प. प्रकाश महाराज बोधले म्हणाले की, थोर विभूतीला सामान्य माणसात येऊन मिसळावे लागते. व्यवस्थेमध्ये जेष्ठतेला महत्व असते. सर्वसामान्य गोरगरीब लोकांना कळेल असे भगवंताने रूप धारण केले आहे. मार्गदर्शन करणाऱ्यांची शब्द हे प्रचलित व प्रतिष्ठित असावेत असे सांगत जीवनात सतत प्रयत्न करीत रहा चांगले विचार चांगले राहणीमान आणि त्याचबरोबर काळजी करू नका.आरोग्य आणि विचारांची बैठक देणारे अध्यात्मिक क्षेत्र असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. चंद्र सूर्य असेपर्यंत संतांचे विचार सतत मानवीऔ ही जीवनाला दिशा देत राहतील असा विश्वासही त्यांनी उपस्थित हजारो भाविक भक्त जनसमुदायाला दिला.यावेळी प्रचंड टाळ्यांच्या गजरात महाराजांना प्रतिसाद मिळाला.या कीर्तन सेवेला आष्टी शहरासह तालुक्यातील विविध गाव गाड्या वस्तीवरील भाविक भक्त जनसमुदाय उपस्थित होता.गुणवंत गायकानी उत्कृष्ट साथ संगत दिली. यावेळी मंडपामध्ये पंढरी अवतरल्याचा काही क्षण भास झाला.संरक्षण भिंतीसाठी आ.धस देणार आणखी १५ लक्ष रुपये माजी आ.भीमराव धोंडे यांनी माऊली मंदिरासाठी कोट्यावधी रुपये किंमतीची जागा, जमीन दिली तर या मंदिराच्या संरक्षण भिंतीसाठी मागील वर्षी आ.धस यांनी १० लाख रु दिले.हेकाम पुर्ण झाले. माऊली मंडळाने आणखी निधी मागितला म्हणून आणखी १५ लाख रु निधी देत असल्याची घोषणा यावेळी आ.सुरेश धस यांनी यावेळी केली.आ.आजबे यांनी स्वयंपाक गृहासाठी १० लाख रु चा निधी दिला आहे.सतीषआबा शिंदे यांनी ही मंदिरात फिल्टरसाठी ५ लाख रुपये दिले.या सर्व दात्यांचे माऊली सेवा मंडळाने आभार मानले.
--------------------------------------


0 टिप्पण्या