Ticker

6/recent/ticker-posts

चंद्र सूर्य असेपर्यंत संतांचे विचार अमर राहतील- ह भ प प्रकाश महाराज बोधले



सर्वसामान्यांना कळेल असे रूप भगवंताने आपल्यासमोर धारण केले भगवंत हा भक्तीचा भुकेचा असून समता बंधुत्व ही मूल्य म्हणजेच ईश्वर असल्याचे सांगून चंद्र सूर्य असेपर्यंत परमेश्वराचे संतांचे विचार अमर राहतील असे भावपूर्ण मार्गदर्शन अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा ज्येष्ठ किर्तनकार ह भ प प्रकाश महाराज बोधले यांनी केले.आष्टी येथील श्री संत ज्ञानेश्वर माऊली महाराज चाकरवाडीकर यांच्या २३ व्या. पुण्यस्मरणानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त संत नामदेव महाराजांच्या सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी चरित्र कथा व अखंड हरिनाम सप्ताहातील काल्याचे  कीर्तन प्रसंगी अ.भा.वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प.प्रकाश महाराज बोधले  बोलत होते. प्रारंभी संतांच्या विविध अप्रतिमंना अभिवादन करून वारकऱ्यांच्या प्रचंड उत्साह पूर्ण साथ संगतीचे कौतुक करत ह भ प प्रकाश महाराज बोधले म्हणाले थोर विभूतीला सामान्य माणसात येऊन मिसळावे लागते व्यवस्थेमध्ये जेष्ठतेला महत्व असते सर्वसामान्य गोरगरीब लोकांना कळेल असे भगवंताने रूप धारण केले आहे मार्गदर्शन करणाऱ्यांची शब्द हे प्रचलित व प्रतिष्ठित असावेत असे सांगत जीवनात सतत प्रयत्न करीत रहा चांगले विचार चांगले राहणीमान आणि त्याचबरोबर काळजी करू नका आरोग्य आणि विचारांची बैठक देणारे अध्यात्मिक क्षेत्र असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. चंद्र सूर्य असेपर्यंत संतांचे विचार सतत मानवी जीवनाला दिशा देत राहतील असा विश्वास हे त्यांनी उपस्थित हजारो भाविक भक्त जनसमुदायाला दिला. यावेळी प्रचंड टाळ्यांच्या घसारामध्ये महाराजांना प्रतिसाद मिळाला.या कीर्तन सेवेला कडा असतीसह तालुक्यातील विविध गाव गाड्या वस्तीवरील भाविक भक्तावर जन्म उपस्थित होते गुन्हे गायकाने उत्कृष्ट साथ संघट दिले. यावेळी मंडपामध्ये पंढरी अवतरल्याचा काही क्षण भास झाला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या