डा.सय्यद हुमायुद्दीनचे आजोबा आणि कवी प्रा.सय्यद अल्लाउद्दीन यांचे वडील अमीनोद्दीन गुरुजी यांच्यापासून या कुटुंबाला मी ओळखतो आहे.चिंचाळ्याला जेव्हा जेव्हा मी जात असे तेव्हा सय्यद गुरुजींना मी निश्चित भेटायचो.आज डॉ.सय्यद डेंटल क्लिनिकच्या रूपाने या कुटुंबाने रुग्णसेवेसी आपली नाळ जोडून घेतली आहे.उपचारा इतकीच रुग्णांची वेदनेची सहनशक्ती अर्थात हिम्मत वाढविणे महत्त्वाचे आहे.निष्ठेने सेवा करण्याची गुणवत्ता सय्यद कुटुंबाच्या पिढी दर पिढीत असल्याने डॉ.सय्यद डेंटल क्लिनिक दंत रुग्णांची चांगली सेवा करील असे माजी आ.भीमराव धोंडे म्हणाले.कवी प्रा.सय्यद अल्लाउद्दीन यांचे चिरंजीव डॉ.सय्यद हुमायुद्दीन यांच्या डॉ.सय्यद डेंटल क्लिनिकच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.यावेळी माजी आ.साहेबराव दरेकर ,आ.बाळासाहेब आजबे,युवानेते जयदत्त धस,डॉ.मधुकर हंबर्डे,अनंत हंबर्डे,डॉ.विलास सोनवणे,डॉ राहुल टेकाडे,डॉ.बालाजी गुट्टे,डॉ.अब्दुल मुजाहिद,डॉ.रासकर,डॉ.बनसोडे,डॉ.महेश नाथ,डॉ.मदन लाड,डॉ.समीर पठाण,डॉ.अजहर बेग,नामदेव राऊत,आजिनाथ सानप,रंगनाथ अण्णा धोंडे,विजयकुमार गोल्हार,अशोक मुळे,हाजी हारून शेठ,अतुल शेठ मेहर,सुखलाल मुथा,सुयोग वाजे,मेहेर सराफ ज्वेलर,सिताराम पोकळे,सय्यद ताहेर जमाल,कृष्णा देशपांडे,प्रफुल्ल सहस्रबुद्धे,उत्तम बोडखे,अविनाश कदम,रत्नदीप निकाळजे,उद्योजक चौधरी,लईक शेठ काझी,संजय शेठ मेहर,डॉ.जाकीर खान,डॉ.पंकज ईजारे,डॉ.नदाफ,राधाकिसन पोकळे,गणपत पोकळे,जालिंदर पोकळे,शेख शरीफ,अनिल जगदाळे, महाराष्ट्र केसरी सईद चाऊस,डॉ.नदीम,पंडित कल्याण पोकळे, जमीर काझी,ज्ञानेश्वर पोकळे,भाऊसाहेब तावरे,प्रा.हरेश चाऊस,लक्ष्मण रेडेकर,भाऊसाहेब निंबाळकर,शेख बाबासाहेब,पी.वाय. काळे,शेख इस्माईल, शेख चांद,सिकंदर,तात्यासाहेब शेंडगे,सय्यद गफूर,संजय शिंगवी,एकनाथ धोंडे,सुभाष रासकर,अनिल जगदाळे,मधुकर सोळसे,सय्यद हबीब हुसेन,प्रा.आनंद देशमुखे,सय्यद महेबुब,प्रा.अशोक भोगाडे,वाहेद पठाण,प्रा.जे.एम.पठाण,प्रा.बबन उकले,
डॉ.जासूद,ईदगाह मौलाना,अशा अनेक मान्यवरांनी उद्घाटनाला हजेरी लावली.सूत्रसंचालन डॉ.अभय शिंदे,संतोष दाणी,कवी हरीश हातवटे यांनी केले.

0 टिप्पण्या