Ticker

6/recent/ticker-posts

पंढरीच्या वाटेत इतिहास; प्रथमच श्वेतध्वजाचे पुजन!

हिंदू मुस्लिम द्वेत नाहीसे करणारी महान विभूती संतशिरोमणी शेख महमंद महाराज 




 यांचे जन्मगाव असलेल्या श्रीक्षेत्र वाहिरा येथून पंढरपूर पालखी सोहळ्याचे मोठ्या आनंदाने प्रस्थान झाले.मंगळवारी दि.२० तीन रोजी सकाळी संत शिरोमणी शेख महंमद महाराज यांच्या समाधीला फुलांची चादर अर्पण करण्यात आली.त्यानंतर उद्योजक किरण गावडे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. सरपंच ईश्वर मेटे, विठ्ठल लांडगे, पत्रकार सूर्यकांत नेटके यांच्या हस्ते श्वेत ध्वजपुजन करण्यात आले. त्यानंतर पालखी सोहळा मार्गस्थ झाला.यावेळी डॉ.सुर्यकांत वरकड, प्रा.दादासाहेब झांजे,डाॅ.प्रकाश झांजे,बाळासाहेब मिसाळ,पांडूरंग गावडे,वाहिरा गावचे सरपंच संभाजी गाडे,उपसरपंच योगेश झांजे,सरपंच ईश्वर मेटे, घोंगडेवाडीचे सरपंच भाऊसाहेब गावडे,उपसरपंच विकास माळशिखरे,शिवाजीराव सुरवसे ,गंगाधर आटोळे,संजयकुमार माळशिखरे,मनसे नेते भाऊसाहेब मेटे,दिलीप महाराज माळशिखरे, ह.भ.प.सोमनाथ महाराज मेटे,ह.भ.प.सुखदेव महाराज झांजे, विजय महाराज घोंगडे, किसन महाराज आटोळे, नवनाथ आटोळे, भाऊसाहेब झांजे, हरीदास झांजे,अर्जुन काकडे,उद्योजक हरिदास झांजे, भाऊसाहेब झांजे आदीसह पंचक्रोशीतील वारकरी उपस्थित होते.प्रास्ताविक संत शिरोमणी शेख महंमद महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष ह.भ.प सिद्धीनाथ मेटे महाराज यांनी केले. तर, आभार ह.भ.प.सोमनाथ शेलार सर यांनी मानले.पालखी सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी सुदाम मेटे, गणेश माळशिकारे, सदाशिव पगारे, आसाराम फरतारे, शेषराव आटोळे, मधुकर टोने, विजय महाराज घोंगडे आदींसह पंचक्रोशीतील वारकरी व ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या