Ticker

6/recent/ticker-posts

चोरी केलेले सोने परत दिल्याने प्राचार्य विश्वनाथ शिंदे दांपत्याकडून बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेचे आभार


  आष्टी येथील सेवानिवृत्त प्राचार्य विश्वनाथ लहाणु
 शिंदे यांच्या पत्नी सौ.विजया विश्वनाथ शिंदे या पुणे
 येथे  जाण्यासाठी दि.१८ मे रोजी दुपारी साडेतीन 
वा.आष्टी येथील बस स्थानकात मोकळ्या जागेत 
उभ्या असताना तेवढ्यात पुणे जाणारी बस आल्याचे
 पाहून बस मागून आलेल्या दोन अज्ञात इस्मानाने 
सौ.विजया शिंदे यांच्या गळ्यातील सोनसाखळी आणि
 गंठण ६८ ग्रॅम वजनाचे असलेले ऐवज ओरबाडून
 धूम ठोकली.ही घटना समजतात आष्टीचे  पोलिस 
निरीक्षक कदम,सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय
 देशमुख,पोलीस उपनिरीक्षकनामदेव धनवडे आणि 
पोलीस कर्मचारी विलास गुंडाळे आणि आष्टी येथील
 पत्रकार उत्तम बोडखे,प्रविण पोकळे,संतोष सानप,
मनोज पोकळे या सर्वांनी आष्टी पोलीस स्टेशनच्या
 कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून बीड येथील स्थानिक 
  गुन्हे शाखा यांच्याशी संपर्क करून प्राचार्य विश्वनाथ
 शिंदे यांना बीड पोलीस अत्यंत कार्यक्षम असून तुमचे
 चोरीस गेलेले सोने परत मिळवून देऊ असा विश्वास 
दिल्याने 


 ्श्व्श्व्श्व्श्व्श््श्व्श्व्श्व्श्व

   शिंदे आणि दांपत्य यांना थोडा धीर आला होता.
त्यानंतर अवघ्या पाच दिवसातच बीड जिल्हा 
  पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर,अतिरिक्त पोलीस 
   अधीक्षक सचिन पांडकर  यांच्या मार्गदर्शनाखाली बीड 
   येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश 
   वाघ,कर्मचारी सोमनाथ गायकवाड,प्रसाद कदम, 
    मनोज वाघ,विकास वाघमारे आणि सचिन अंधेले 
   

      या टीमने अत्यंत उत्तम कामगिरी करून पाथर्डी
   तालुक्यातील दोन चोरट्यांना दुसऱ्या राज्यातून अटक
    केली आणि त्यांच्याकडून चोरीस गेलेला ऐवज जप्त
    करून सौ.विजया शिंदे आणि माजी प्राचार्य विश्वनाथ
   शिंदे सेवानिवृत्त असलेल्या दांपत्याच्या स्वाधीन केले 
   चोरीला झालेले सोने हातात आल्याने शिंदे दांपत्यांना
  यामुळे फार मोठा दिलासा मिळाला असल्याने त्यांनी
   बीड जिल्हा पोलीस दलाचे प्रमुख पोलीस अधीक्षक 
  नंदकुमार ठाकूर,अतिरिक्त पोलीस अधीक्षक सचिन 
  पांडकर तसेच विशेष गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक
   सतीश वाघ,पोलिस कर्मचारी सोमनाथ गायकवाड,
   प्रसाद कदम,मनोज वाघ,विकास वाघमारे आणि सचिन
   अंधेले या टीमचे तर आष्टीचे तत्कालीन पोलिस निरीक्षक 
  कदम,सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय देशमुख,पोलीस 
   उपनिरीक्षक नामदेव धनवडे आणि पोलीस कर्मचारी
   विलास गुंडाळे यांच्या समवेत आष्टीचे पत्रकार उत्तम
   बोडखे,प्रविण पोकळे,मनोज पोकळे आणि संतोष
    सानप यांचे विशेष अभिनंदन करून आभार मानले
     आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या