'संगम अकादमी तथा पब्लिकेशन कोटा राजस्थान यांच्या वतीने साहित्य क्षेत्रातील नामवंत लेखकांना दिला जाणारा यंदाचा 'संगम साहित्य सेवा सन्मान-२०२३' सुप्रसिद्ध हिंदी साहित्यिक प्रा.आशा फड यांना प्रदान करण्यात आला आहे.प्रा.आशा फड यांचा 'जोहरा एक मूल्यांकन' हा उपन्यास स्त्रियांच्या विविध समस्यांवर अत्यंत परखड प्रकाश टाकणारा आहे. या पुस्तकाचे प्रकाशन माजी मंत्री तथा गोपीनाथराव मुंडे प्रतिष्ठानच्या अध्यक्ष पंकजाताई मुंडे आणि माजी आमदार भीमरावजी धोंडे यांच्या हस्ते झाले होते.
त्यांनी भाषा साहित्य यामधून प्रचार प्रसार आणि साहित्यातून अमूल्य योगदान दिले आहे. महिलांच्या विविधांगी समस्यांवर गेल्या दोन दशकाहुन अधिक काळात पुस्तक आणि वृत्तपत्रातील लेखांमधून जागृती केली आहे. याची दखल घेत संगम अकादमी राजस्थान यांच्यावतीने 'संगम साहित्य सेवा सन्मान- २०२३' हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. यावेळी आपल्या लेखणीतून उज्वल भविष्याची त्यांनी अपेक्षा संगम अकादमी तथा पब्लिकेशनचे संस्थापक ओमप्रकाश लववंशी यांनी केली आहे.या सन्मानाबद्दल प्रा.आशा फड यांचे अभिनंदन प्राचार्य डॉ. हरिदास विधाते, प्राचार्य डॉ. बाबासाहेब हंगे, डॉ. बळीराम राख, उपप्राचार्य डॉ.बिबीषण फड, डॉ. अरविंद घोडके, डॉ.प्रो. मुरलीधर लहाडे, डॉ. लहू मुंडे, प्राचार्य डॉ.कैलास वायबसे, डॉ. आर्या मॅडम, डॉ.गुलाबराव मंडलिक, डॉ.ए.आर.पटेल, डॉ.काझी मॅडम, पोलीस अधीक्षक लता फड, कृषी विस्तार अधिकारी शकुंतला चाटे, सविता वारे, गीतांजली जायभाये, सविता सोनवणे, सीमा घोलप, शितल सोनवणे आदीसह हिंदी साहित्य विश्वातील मान्यवरांनी केले आहे.
----------------------------------------

0 टिप्पण्या