आष्टी तालुक्याचे भुषण ठरलेल्या शुभम काळे
याने आष्टी तालुक्यातील निट परीक्षेतील आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडत २०२३ मध्ये झालेल्या निट परीक्षेत ७०० पैकी ६६५ गुण प्राप्त करून तालुक्यात सर्वप्रथम येण्याचा मान मिळविला आहे. शुभम हा जि.प.प्राथमिक शिक्षक आप्पासहेब काळे यांचा मुलगा आहे.आष्टी दुध संघाचे चेअरमन शांतीलाल भोसले यांच्या कन्येचा शुभम हा मुलगा आहे.शुभम काळे हा आष्टीमधील वसुंधरा विद्यालयातुन १०० टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाला होता.
बारावी लातुर शहरातील राजर्षी शाहू कॉलेजमधुनन नीटची तयारी केली होती. JEE MAINS मधेही ९९ टक्के घेतलेले आहेत.या घवघवीत यशामुळे शुभमला
महाराष्ट्रातील नामांकित व टॉप असण-या मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळणार आहे.शुभमचे या घवघवीत यशाबद्दल आ.सुरेश धस , चेअरमन शांतीलाल भोसले, व्हाईस चेअरमन अशोक गर्जे,पोपट धुमाळ,भरत जाधव, हनुमंत जंजिरे, मच्छिंद्र धनवडे आदींनी अभिनंदन केले.
0 टिप्पण्या