Ticker

6/recent/ticker-posts

स्वातंत्र्य चळवळीतील राष्ट्रभक्त स्वातंत्र्य सेनानी बापुराव भापकर....







उत्तम बोडखे, आष्टी.

     आष्टीचे ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक बापुराव भापकरमामा म्हणजे म्हणजे अनुभवाचे एक विद्यापीठ होते.आष्टी तालुक्यातील ते  जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक होते.जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी म्हणून त्यांचा नावलौकिक होता.

मराठवाडा मुक्ती संग्रामात त्यांनी लढे केले आहेत.स्वातंत्र्य चळवळीत भापकर मामा यांचे मोलाचे व उल्लेखनीय कार्य होते. या कामामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व उत्तुंग  झालेले आहे.निजामाच्या जुलमी राजवटीविरुद्ध बंड करून मराठवाडा मुक्ती लढ्याची चळवळ उभी केली होती.भापकरमामा म्हणजे जुन्या पिढीतील त्यागी व्यक्तिमत्त्व होते.प्रेम,जिव्हाळा,माया,ममता या सर्व गोष्टी केवळ भास आहेत आणि शब्द किंवा दिलेले वचन श्रेष्ठ असते यावर त्यांचा कटाक्ष होता.उतारवयात देखील त्यांनी दिलेला शब्द खरा करून दाखवत असतात.तनमनधनाने ते समाजकारणात होते.

    'बंड कोणत्याही प्रकारचा असो, त्यात देशप्रेम,राष्ट्रप्रेम आणि त्यातील सामान्य माणसाच्या सुखाचा आणि आनंदाचा विचार झाला पाहिजे!' जेव्हा अज्ञान अंधश्रद्धा आणि अनारोग्याच्या दुःखाने माणसे भरली जात होती, पारतंत्र्य मध्ये अत्यंत दुःखमय जीवन जगत होती.तेव्हा भारत मातेच्या रक्षणासाठी आणि स्वातंत्र्यासाठी विविध राज्यातील त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील मराठवाड्यातील अनेक सुपुत्र स्वतःचा जीव धोक्यात घालून पुढे सरसावली जात होती.याचा ज्वलंत आणि जाज्वल्य इतिहास आहे.स्वातंत्र्याच्या क्रांतिकारी इतिहासामध्ये मराठवाड्यातील बीड जिल्ह्याच्या स्वातंत्र्य सैनिकाची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहिली आहे. सामान्यांचे जीवन पारतंत्र्यातून निघून स्वातंत्र्याच्या सुखाने ओसंडून वाहून जावे यासाठी अनेक सुपुत्रांनी महान कार्य हाती घेतले त्यात आष्टी तालुक्यातील कासारी येथील बापुराव भापकरमामा यांची भूमिका आणि कार्य संस्मरणीय आहे.दि.९ जुलै १९३१ साली आष्टी तालुक्यातील कासारी येथे जन्मलेल्या बापूराव बंडोजी भापकर यांनी इंग्रज काळात घोगरगाव येथे शाळेत शिक्षण घेत असताना मोगलाई आणि नदी येते संघर्ष केला.संभाजी बोरुडे घोगरगाव, लहानु जाधव,शेख वजीरभाई,बाबू कोळी,भीमा भोसले आदीसह स्वातंत्र्यसेनानी यांच्याबरोबर ते जात असत.गांधीटोपी धारण करून आणि तिरंगा ध्वज हाती घेऊन सबंध खेड्यापाड्यांमध्ये जनजागृती करण्याची महान स्वतंत्र चळवळ हाती घेण्याचे आणि माहिती देण्याचे अमूल्य कार्य त्यांनी केले.१९४७ मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि तोंडा तोंडी माहिती मिळाली की,२५ ते ५० लोकांच्या यादीमध्ये पोलीस पाटील यांच्याकडे आली आहे.त्यांना अटक करण्यात येणार आहे.घोगरगाव हे भापकरमामाचे गाव असल्याने इथे ते राहायचे.तसे मूळ गाव त्यांचे अहमदनगर तालुक्यातील गुंडेगाव हे आहे.आष्टी आल्यानंतर त्यांनी स्वतंत्र चळवळीत सक्रिय भाग घेतला. टाकळी अमिया येथे जो हरिभाऊ जगताप रा. बनपिंपरी या स्वतंत्र सैनिकावर रझाकाराने गोळीबार केला होता.

त्याप्रसंगी भापकरमामा तिथे उपस्थित होते. त्यात हरिभाऊ जगताप हे शहीद झाले होते.दरम्यान शेरी बुद्रुक येथे ३०० ठाणेदार त्यावेळचे मालगुजारी वसुलीसाठी ठाणेदार व मामलेदार आले होते.पोलीस व तहसील विभागाचे १० ते १५ अधिकारी कर्मचारीसुद्धा आले होते. त्या रात्री नामदेव वाघुले गुरुजी त्यांनी खर्ड्याची शहा आसराजी जगताप यांना शहर येथे आले आहे तसे गुप्त माहिती दिली. त्या माहितीनुसार आष्टी तालुक्यातील २५० ते ३०० स्वतंत्र सैनिक एकत्र आले आणि रात्रीच त्यांच्यावर हल्ला केला.गोळीबार अधिकारी व कर्मचारी यांचे हे रात्री दीड वाजता भरझोपेत असताना पोलीस रायफल हातात घेऊन उभे असताना त्यांना घाबरवण्यासाठी व तेथून पळून जावेत म्हणून त्यांनी अचानक गोळीबार केल्याने ते घाबरून मुस्लिम समाजाचे हे कर्मचारी पळून वाट दिसेल तिकडे पळून गेले.मग सकाळी नामदेव वाघुले गावातील प्रमुख लोक यांनी स्वतंत्र सैनिक जमा केलेले धान्य मालगुजारी शेतकऱ्यांना व ज्यांनी-ज्यांनी दिले होते ते प्रमाणिकपणे सांगितल्याप्रमाणे वाटून टाकले.आष्टी तालुक्यातील स्वातंत्रसैनिक सेवाभावी संस्था १३ मार्च २००७ रोजी त्यांनी ११ जणांनी रजिस्ट्रेशन केले.यामधील ९ जण मृत्यु पावले आहेत.या सेवाभावी संस्थेचे उपाध्यक्ष म्हणून ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक बापूराव भापकर यांनी उत्कृष्ट कार्य केले.  स्वातंत्र्य चळवळीमध्ये अत्यंत धाडसीपणे निर्भीडपणे आणि देशप्रेम आणि राष्ट्रप्रेमाने ज्वलंत भावना मनामध्ये निर्माण करून राष्ट्रासाठी येथील समाजाच्या भवितव्यासाठी ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक बाबुराव भापकरमामा यांनी केलेले महान कार्य बीड जिल्ह्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. त्यांनी यासंदर्भात दिलेली स्वतंत्र प्रेमाची, प्रत्यक्षातली माहिती अंगावर शहारे आणणारी होती. त्यांचे देशप्रेम राष्ट्रप्रेम समाज प्रेम कायम येथील तरुणांच्या मनात प्रेरणा निर्माण करणारे ठरेल... सतीश भापकर,राजाभाऊ भापकर आणि कल्याण भापकर असे तीन मुले,चार मुली,सुना,सात नातवंडे असा मोठा परिवार आहे. गुरुवार दि.२२ जुन रोजी कासारी येथे दशक्रियाविधी होणार आहे.त्यानिमित्त ह.भ.प.श्रीहरी पुरी महाराज यांचे प्रवचन होणार आहे.

-------- उत्तम बोडखे.

   


--------------------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या