पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १०२ व्या. मन की बात कार्यक्रमाला बीड जिल्ह्याच्या पाटोदा तालुक्यातील श्रीक्षेत्र गहिनीनाथगडावर नेते, कार्यकर्ते व वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये मोठा प्रतिसाद मिळाला. श्रीक्षेत्र गहिनीनाथगडाचे महंत मठाधिपती विठ्ठल महाराज गहिनीनाथगडकर, आष्टी,पाटोदा,शिरूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आ.शिक्षण भीमराव धोंडे,पंचायत समिती सभापती सौ.सुवर्णाताई लांबरूड, भाजपाचे शंकर देशमुख यांच्यासह, पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वीही देशातील जनतेशी अनेकवेळा सुसंवाद साधला आहे. आजच्या " मन कि बात " या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशहिताच्या दृष्टीने राबवलेल्या विविध योजना तसेच सर्वसामान्य गोरगरीब दुबळ्या अनाथ अपंग शेतकरी शेतमजूर आणि वंचित घटकांसह ऊसतोड कामगारांच्या बाबतीत राबवलेले धोरण या अनुषंगाने विस्तृत विवेचन केलेले आहे.आज १०२ वी. मन की बात चा कार्यक्रम वारकरी यांच्या उपस्थितीत श्री क्षेत्र गहिनीनाथगड येथे महंत विठ्ठल महाराज गहिनीनाथगडकर आणि माजी आ भीमराव धोंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.त्याप्रसंगी वाल्मिकतात्या निकाळजे, उपसभापती पांडुरंग नागरगोजे, सभापती सौ. सुवर्णाताई लांबरूड , बाळासाहेब पवार,सरपंच तात्यासाहेब लाड, प्रशांत गाडे, ज्ञानदेव जाधवर,सरोदे सर, काकासाहेब लांबरूड,बाबुशेठ भंडारी,माऊली पानसंबळ,संपत जायभाय,शंकर देशमुख,सुनिल सानप,अशोक सानप उपसरपंच ब्रम्हगाव कासेवाडी आंबेवाडी,नामदेव सांगळे,आण्णासाहेब भोसले,सतिश सानप ,गणेश सानप अभाविप पुणे व विविध भागांतील वारकरी उपस्थित होते.




0 टिप्पण्या