'प्रचंड त्याग, कष्ट, प्रामाणिकपणा आणि संकटाचा धैर्याने सामना ही जीवनमूल्य अंगी बाळगून अगदी बालवयापासून निडरपणे सर्वसामान्य गोरगरीब दीनदलीत दुबळ्या अनाथ अपंग शेतकरी शेतमजुरासह वंचित घटक आणि ऊसतोड कामगारांच्या जीवनात त्यांचे प्रश्न सोडवून नवी उमेद निर्माण करणारा बीड जिल्ह्याच्या परळी वैजनाथ तालुक्यासह धर्मापुरी या तीर्थक्षेत्राच्या गावातील एक अत्यंत तडफदार लोकप्रिय
नेतृत्व गोविंदराव फड यांच्या वर अभिष्टचिंतन दिनाच्या निमित्ताने सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव झाला.धर्मापुरी हे परळी वैजनाथ तालुक्यातील ऐतिहासिक आणि तीर्थक्षेत्र म्हणून नावारूपास आलेले सुप्रसिद्ध आहे विविध जाती धर्माचे लोक या गावात गुन्हा गोविंदाने नांदतात. आंबेजोगाई- अहमदपूर रस्त्यावर असलेल्या या अत्यंत मोठ्या गावात ऐतिहासिक किल्ला आहे या किल्ल्याच्या डागडुजीसाठी एडवोकेट गोविंदराव फड यांनी मोठा निधी आणून ऐतिहासिक साधनाचे महत्त्व आधोरेखित केले आहे.गावचे वैभव आणि श्रद्धास्थान असलेले श्रीक्षेत्र केदारेश्वर मंदिर, रोकडेश्वर मंदिर, त्रिगुनेश्वर देवस्थान आणि मलिकार्जुन मंदिर यांच्यावर नितांत श्रद्धा ठेवून गोविंदराव फड यांनी गावच्या विकासात महत्त्वाचे योगदान दिले आहे गेल्या दोन टर्म अत्यंत मोठ्या असलेल्या ग्रामपंचायत मध्ये अत्यंत सहजरित्या ग्रामस्थांच्या पाठबळावर बहुमताने आपल्या यशाचा झेंडा यशस्वीपणे डोलावत विजयश्री हसील केली आहे. महाराष्ट्राचे माजी सामाजिक न्याय तथा बीड जिल्हा पालकमंत्री माननीय धनंजयजी मुंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली अत्यंत विश्वासू कार्यकर्ता म्हणून त्यांनी आपल्या नावाची एक वेगळी क्रेझ बीड जिल्ह्यात निर्माण केली आहे.गावात संपूर्ण सिमेंट रस्ते नाल्या स्वच्छता मोहीम व वृक्षारोपण आरोग्य सुविधा पाणीपुरवठा, आरोग्य आणि शिक्षण यासारख्या मूलभूत गरजांची पूर्ती करून गोविंदराव फड यांनी ग्रामस्थांची अफाट लोकप्रियता मिळवली आहे.धार्मिक जातीय सलोखा राखण्याचे दिव्य कार्य हे त्यांचे मोठे फलित आहे शादी खाना बौद्ध विहार किल्ला याची संरक्षण भिंत आणि डागडोजी यासारख्या मोठ्या योजना त्यांनी हाती घेतले आहेत. घरकुल योजना, शेत तलाव विहिरी या शेतकऱ्यांच्या अत्यंत महत्त्वाच्या मागण्या त्यांनी शासन दरबारी मांडुन त्यात पूर्णत्वास नेल्या आहेत.
परळी पंचायत समितीचे सभापती म्हणून त्यांनी केलेले कार्य सर्वांच्या स्मरणात आहे कृषी उत्पन्न बाजार समिती परळी वैजनाथ या पदावरही त्यांनी राहून शेतकऱ्यांचे विविध प्रश्न धसास लावले आहेत सध्या त्यांच्या सुविद्य पत्नी या गावच्या प्रथम नागरिक तथा सरपंच म्हणून कार्यरत आहेत.सर्वसामान्यांचे प्रश्न दैनंदिन समस्या अहोरात्र सोडविण्याचे दिव्यकार्य त्यांच्याकडून होत असते म्हणूनच अगदी त्यांच्या कार्यालयात सदैव सर्वसामान्यांची गर्दी असते.
अशा या परळी तालुक्यातील माननीय माजी मंत्री धनंजयजी मुंडे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून व मार्गदर्शनावर ग्रामस्थांच्या भल्यासाठी आहोरात्र झटणारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून गोरगरीब दिन दलित दुबळ्या अनाथ अपंग शेतकरी शेतमजुरांचे प्रश्न सोडवणारा एक ध्येयवादी लोकप्रिय नायक, जनतेचे प्रेम मिळवलेले कार्यकर्ते अर्थात एडवोकेट गोविंदराव फड यांचा अभिष्टचिंतन दिन असल्याने जनतेचे दुःख असेच सदैव दूर करण्यासाठी माननीय वकील साहेबांना दीर्घायुष्य लाभावे, अशी केदारेश्वर चरणी प्रार्थना करण्यात आली. वाढदिवसाच्या निमित्ताने परळी वैजनाथ तालुक्यातील विविध गाव वाड्या वस्त्यासह, वरिष्ठ नेते, कार्यकर्ते, समाजधूरिण शेतकरी कामगार आणि सर्वसामान्य गोरगरिबांनी त्यांच्यावर दिवसभर सत्कार अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव केला.

---------------------------------------

0 टिप्पण्या