डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती
संभाजीनगर संलग्नित कडा येथील गांधी कॉलेजमध्ये
कार्यरत असलेले अर्थशास्त्र विषयाचे प्रोफेसर डॉ.
अशोक कोरडे यांनी व्यवसायातील आर्थिक
कार्यक्षमता वाढवण्यासाठी ग्रामीण व शहरी
भागातील व्यवसायांचा आर्थिक अभ्यास करून
" इंटेलिजन्ट टूल्स अँड टेकनिक फॉर मॉडर्न मॅनेजमेंट
टेक्नॉलॉजी टू इम्प्रूव बिझनेस ईफिसियंसी " या
विषयाच्या पेटंट करिता भारतीय पेटंट प्राधिकरणाकडे
नोंदणी केली होती.प्रोफेसर डॉ.कोरडे यांनी विद्यापीठ
स्तरावर राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी,
राष्ट्रीय सेवा योजनेचे बीड जिल्हा समन्वयक,अर्थशास्त्र
विषयाचे बोर्ड ऑफ स्टडी मेंबर,लाईफ लॉंग लर्निंग
व एक्सटेन्शन विषयाचे बोर्ड ऑफ स्टडी मेंबर आदि
महत्वाची पदे भुषवली आहेत. विद्यापीठामार्फत व
आंतरराष्ट्रीय परिषदेमार्फत उत्कृष्ट कार्यक्रमाधिकारी
पुरस्कार,बेस्ट इकॉनॉमिस्ट अवॉर्ड,बेस्ट अकॅडमिशियन
अवॉर्ड आदी विविध पुरस्काराने डॉ.अशोक कोरडे
यांना गौरविण्यात आलेले आहे.यांच्यासोबत
सहकारी म्हणून प्रो.डॉ.प्रविण शास्त्री व संशोधक
विद्यार्थी किशोर दळवे (एम.जी.एम विद्यापीठ,
छत्रपती संभाजीनगर), प्रोफेसर डॉ.सिद्धार्थ
धोंगडे (गितम विद्यापीठ, विशाखापट्टणम) या
सर्वांनी सोबत संशोधन केले. " इंटेलिजन्ट टूल्स
अँड टेकनिक फॉर मॉडर्न मॅनेजमेंट टेक्नॉलॉजी
टू इम्प्रूव बिझनेस ईफिसियंसी " या विषयातील
नाविन्यपूर्ण कार्याची योग्य ती पडताळणी करून
मेहनतीची दखल घेत प्रोफेसर डॉ.अशोक कोरडेसह
एकत्रित सहकाऱ्यांच्या या पेटंटला भारतीय पेटंट
प्राधिकरणाकडून मान्यता प्राप्त झाली आहे.
या संशोधन कार्याबद्दल डॉ. अशोक कोरडे यांचे
श्री अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळाचे पदाधिकारी
योगेश भंडारी,हेमंत पोखरणा , गोकुळदास मेहेर,
कांतिलाल चानोदिया, अनिल झाडमुथ्था, विद्यापीठाचे
राज्यपाल नियुक्त M.C मेंबर डॉ. गजानन सानप,
डॉ.सचिन कंदले,डॉ.सतिष पाटील,डॉ.चंद्रकांत कोरडे,
डॉ. विलास खंदारे ,डॉ.सुनिल पंढरे, डॉ.शिवराज पाताळे,
डॉ.सुपर्णा देशमुख, प्राचार्य डॉ.नंदकुमार राठी,
उपप्राचार्य डॉ. जवाहरलाल भंडारी,गांधी,आष्टी
शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष किशोर हंबर्डे,
कल्याण पोकळे,प्राचार्य डॉ.हरिदास विधाते,
प्राचार्य डॉ.नवनाथ आघाव,डॉ.कालिदास भांगे,डॉ.
व्यंकटेश लांब,डॉ.हरि जमाले,जि.प.सदस्य गुलाब

0 टिप्पण्या