Ticker

6/recent/ticker-posts

संतश्रेष्ठ नामदेव महाराज हे नामवेदाचे आणि नामविद्येचे आद्य प्रणेते होते -------- ह.भ.प.शंकर महाराज शेवाळे


 भक्त शिरोमणी संत नामदेव हे संत ज्ञानेश्वरांच्या कालखंडात होऊन गेले. वारकरी संप्रदायाचे प्रचारक नामदेव महाराज हे नामवेदाचे आणि नामविद्येचे आद्य प्रणेते असलेले महाराष्ट्रातील एक थोर संत होते असे प्रतिपादन ह.भ.प.धर्माचार्य शंकर महाराज शेवाळे यांनी केले.

   ्आ्ष्टी येथील श्री संत ज्ञानेश्वर माऊली महाराज चाकरवाडीकर यांच्या २३ व्या. पुण्यस्मरणानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त संत नामदेव महाराजांच्या सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी चरित्र कथा समारोप करताना ते बोलत होते.ह.भ.प. शंकर महाराज शेवाळे पुढे म्हणाले की,संत श्रेष्ठ नामदेव महाराज आपल्या कीर्तन कलेमुळे प्रत्यक्ष पांडुरंगाला डोलायला लावणारी अशी त्यांची कीर्ती होती.संत नामदेव प्रत्यक्ष श्री विठ्ठलाच्या निकटवर्ती असलेला सखा होता.संत नामदेव हे वारकरी संप्रदायाचे महान प्रचारक होते.औढा येथील मंदिर फिरविले अशी संत नामदेवांची कीर्ती आहे.भारतभर त्यांनी याबाबतीत भावनिक एकात्मता साधली भागवत धर्माची पताका पंजाबपर्यंत घेऊन जाण्याचे कार्य त्यांनी स्वकर्तृत्वाने केले.हिंगोली जिल्ह्यातील नरसी नामदेव हे संत नामदेवाचे जन्मगाव आहे. संत नामदेवांना ८० वर्षाचे दिर्घआयुष्य लाभले.त्यांचे बालपण पंढरपुरात गेले त्यांनी लहानपणापासून श्री विठ्ठलाची अनन्यसाधारण भक्ती केली स्वतःला नामयाची दासी असे म्हणणाऱ्या संत जनाबाई या त्यांच्या परिवारातील एक सदस्य होत्या.संत नामदेवांची अभंगगाथा प्रसिद्ध आहे. सुमारे २५०० अभंग त्यांनी लिहिले आहेत. त्यांनी शौरसेनी भाषेत काही अभंग रचना केले आहेत. त्यातील सुमारे ६२ अभंग शिखपंथाच्या गुरु ग्रंथ साहेबमध्ये गुरुमुखी लिपीत घेतलेले आहेत. संत नामदेवांनी आदि,समाधी व तीर्थावळी किंवा तीर्थावली या गाथेतील तीन अध्यायातून संत ज्ञानेश्वरांचे चरित्र सांगितले आहे.त्यांच्या कीर्तनामध्ये चांगल्या ग्रंथाचा उल्लेख असे यावरून ते बहुश्रुत आणि अभ्यासू असलेले लक्षात येते.  " नामदेव कीर्तन करी, पुढे देव नाचे पांडुरंग " अशी त्यांची योग्यता होती." नाचू कीर्तनाचे रंगी लाऊ ज्ञानदीप जगी .." हे त्यांच्या आयुष्याची ध्येय होते. भागवत धर्माचे एक आद्य प्रचारक म्हणून संत नामदेवांनी संत ज्ञानेश्वरांच्या संजीवन समाधीनंतर सुमारे ५० वर्षे भागवत धर्माचा प्रचार केला. प्रतिकूल परिस्थितीमध्ये महाराष्ट्राची भावनिक एकात्मता जपण्याचे अवघड काम त्यांनी केले.पंजाबमधील शीख बांधवांना ते आपले वाटतात. शीख बांधव नामदेवबाबा म्हणून त्यांचा गुणगान गातात. शबदकीर्तन आणि महाराष्ट्रातील वारकरी कीर्तन यात विलक्षण साम्य आहे.घुमान पंजाब येथे शीख बांधवांनी त्यांचे मंदिर उभारले आहे. राजस्थानातील शीख बांधवांनीही नामदेवाची मंदिरे उभारले आहेत.संत शिरोमणी असे यथार्थ संबोधन त्यांच्याबद्दल वापरले जाते असे सांगून हरिभक्त परायण शेवाळे महाराज म्हणाले की,भगवद भक्तांच्या व साधुसंतांच्या चरणधुळीचा स्पर्श व्हावा म्हणून पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिराच्या महाद्वारी पायरीचा दगड होण्यात त्यांनी धन्यता मानली. भक्ती किती एकात्म असावी याचे उत्तम उदाहरण म्हणजे  संत नामदेव आहेत. नामदेव महाराज लहान असताना त्यांच्या वडिलांनी त्यांना सांगितले आज देवाला तू प्रसाद दाखव त्या दिवशी नामदेवाने नुसता नैवेद्य दाखवला नाही तर देवापुढे वाट बघत बसले की हा केव्हा खाईल ? त्या अत्यंत निरागस अपेक्षेला मान देऊन प्रत्यक्ष विठ्ठल प्रकट झाले.आणि नामदेवांनी दिलेला प्रसाद त्यांनी ग्रहण केला.. तसेच दुसऱ्या एखाद्या प्रसंगांमध्ये कुत्र्याने चपाती पळवली त्याला ती कोरडी खाऊ लागू नये म्हणून संत नामदेव महाराज तुपाची वाटी घेऊन त्याच्या मागे धावत होते..तसेच एकदा महाशिवरात्रीच्या निमित्ताने संत नामदेव औंढा येथे नागनाथाचे दर्शनासाठी गेले असता मंदिरात भजन कीर्तन न करण्यास पुजाऱ्यांनी  सांगीतले..त्या  त्यांच्या विनंतीस मान देऊन नामदेव मंदिराच्या मागील बाजूस बसून दर्शनासाठी नागनाथाची आळवणी करू लागले. नामदेवाची भक्ती बघून त्यांना दर्शन देण्यासाठी देवाने पूर्वाभिमुख असलेले मंदिर फिरवून पश्चिम बाजूस केले ते आजतागात तसेच आहे असे संतश्रेष्ठ संत शिरोमणी नामदेव महाराज यांनी सनातन धर्मप्रचार करताना नामस्मरणाचे आणि नामविद्येचे महत्त्व समाजाला सांगितले आहे असे त्यांनी शेवटी सांगितले.यावेळी निवृत्ती बोडखे महाराज,श्रीहरी पुरी महाराज,आदिनाथ दानवे महाराज, दिनकरराव तांदळे महाराज,राजेंद्र धोंडे,प्रफुल्ल सहस्रबुद्धे,






उत्तम बोडखे, शरद तळेकर,प्रवीण पोकळे,शरद रेडकर,अशोक डोके, सरपंच अशोक मुळे, नामदेव तावरे, अशोक बळे, हौसराव आजबे,महेश चवरे,शिवाजी बिडवे, तुकाराम भोसले,अनिल गरुड, रविंद्र तवले आदि मान्यवर भाविक भक्त उपस्थित होते.






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या