Ticker

6/recent/ticker-posts

आदर्शमाता् श्रीमती ममताबाई जानदेवबापु हंबर्डे


आष्टी तालुक्यातील सामाजिक,राजकीय क्षेत्रातील एक नामांकीत व्यक्तीमत्व राहिलेले स्व.जानदेवबापु हंबर्डे यांच्या पत्नी श्रीमती ममताबाई हंबर्डे यांचे खरोखरच कौतुक करावे लागेल कारण जुन्या लोकांची वागण्याची पध्दती अतिशय रागट,तापट होती अशा जानदेवबापु हंबर्डे यांच्यासोबत श्रीमती ममताबाईंनी संसार केला.बापु आणि आईनं मुलांसाठी भरपुर करुन ठेवलेले आहे.अशोक हंबर्डे आणि दिलीपदादा हंबर्डे यांनी माता -पित्याचा वारसा समर्थपणे पुढे चालावा...

      चंदनापरी झिजलात तुम्ही, 

     दिव्यापरि तेवलात तुम्ही,

     गंध स्मृतीचा आसमंतात

      दरवळतो आहे 

      साश्रु नयनांनी आम्ही

       आदरांजली वाहतो आहे. "

     आष्टी तालुक्यातील पांढरी येथील एक प्रगतशील शेतकरी.खेड्यात राहणा-या माणसाकडे शिक्षणाविषयीची असलेले दुरदृष्टी,कष्टाने,नितिमत्तेने आणि प्रमाणिकपणाने आपले कुंटुंब प्रगतशील करणारे जानदेवबापू हंबर्डे होते.शेती करताना नवनवीन प्रयोग करुन पीक घेणारे ते प्रयोगशील शेतकरी होते.आपल्या मुला,मुलींवर उत्तम संस्कार करुन त्यांना सामाजिक जीवनात प्रतिष्ठित बनविले.यांंच्या पाठीमागे पत्नी ममताबाई हंबर्डे आहेत.अशोक व दिलीपदादा हे मुले आहेत.आयुष्यात माणसाला सुख कशात आहे माहित नाही पण चेहऱ्यावर नेहमी समाधानी असणे हिच मोठी श्रीमंती होय.पांढरी      येथील शेतकरी कुंटुंबातील एक शांत,संयमी सर्व धार्मिक,सामाजिक, लग्नसोहाळ्यात हजेरी आणि सक्रीय सहभाग घेणारे जानदेवबापू होते.आज ते आपल्यात नाहीत त्यांची आठवण येते. आष्टी तालुक्यातील सर्वात मोठे आणि पहिले  शासकीय नोंदणीकृत गुत्तेदार असलेले आणि हंबर्डे काॕलेजच्या शिक्षण संस्थेचे संचालक जानदेवबापु हंबर्डे यांच्या पत्नी श्रीमती ममताबाई हंबर्डे यांची आज प्रथम पुण्यस्मरण आहे.यानिमित्ताने गेवराईचे येथील ह.भ.प.आक्रुर महाराज साखरे यांचे सकाळी कीर्तन होणार आहे. आष्टी शहरातील प्रसिध्द व्यापारी अशोक हंबर्डे आणि बीड जिल्हा बँकेचे संचालक दिलीपदादा हंबर्डे यांच्या मातोश्री यांच्या श्रीमती ममताबाई हंबर्डे यांचे पुण्यस्मरण सोहळा होत आहे.भगवंताच्या सानिध्यातील मिळणारा आनंद वैश्विक,शाश्वत आणि चिरंतन असतो. देव बघायचा नव्हे तर अनुभवाची बाब आहे. देव जाण्यासाठी प्रेम ओतप्रोत भरलेल असाव.मन श्रद्धेने,भावाने आणि भक्तीने अंतर्भूत असावे.ज्या घरात प्रेम आहे.त्याला ती शक्ती कळते.देव कळण्यासाठी घरात प्रेम,भक्ती आवश्यक आहे.या सर्व बाबी अगदी तंतोतंत पाळणाऱ्या हंबर्डे परिवारातील शांत, संयमी,सज्जन आणि नम्र भाव अंगी असलेल्या ममताबाई हंबर्डे.ममताबाई हंबर्डे यांचं जाणं म्हणजे हंबर्डे परिवाराची 'सावली' जाणे असा अर्थ आहे. सर्वसामान्य गोरगरीब दीनदलित दुबळ्या अनाथ,अपंग,शेतमजूर आणि वंचित घटकांच्या हृदयावर सदैव शिडकावा करणाऱ्या ममताबाई हंबर्डे होत्या.अशोक हंबर्डे आणि दिलीपदादा हंबर्डे यांच्या आई ममताबाई हंबर्डे यांना ईहलोकीचे बोलावणे आले आणि क्षणात हंबर्डे  परिवाराचे छायाछत्र नाहीशी झाले. या दुःखद आणि अपरिहार्य घटनेने हंबर्डे वेदना देणारा,दुःखद प्रसंग आला. बीड जिल्ह्यातील एक नावाजलेले व्यक्तीमत्व म्हणजे जानदेवबापु हंबर्डे होते.त्यांच्या पत्नी ममताबाई हंबर्डे या आदर्श पत्नी,आदर्श माता होत्या.जानदेवबापु हंबर्डे यांच्या मोठेपणामध्ये त्यांच्या सौभाग्यवती अर्धांगिनी ममताबाई हंबर्डे यांचा मोठा वाटा निर्विवाद मोठा आहे.'पत्नीला घाबरावं' असं म्हणतात कारण पत्नी सेवा करते.सेवकाला घाबरले पाहिजे.देव भक्तासाठी काहीही करतो.पांडुरंगाने तुकारामाच्या 'कन्या' चाटून खाल्ल्या हा अध्यात्मिक वास्तव इतिहास आहे.त्या अनुषंगाने अखंड ब्रह्मांडाच्या नायकाचे चिंतन आणि मनन हे मनुष्याच्या जीवनाच्या अंतिम साध्य आहे हे ओळखून जीवन जगले पाहिजे.जानदेवबापु हंबर्डे यांनी अगदी शुन्यातुन विश्व निर्माण केले आहे.नवा इतिहास रचला आहे.या इतिहासाच्या साक्षीदार ममताबाई हंबर्डे होत्या केवळ साक्षीदार नव्हे त्या त्यातील महत्त्वाच्या वाटेकरी होत्या.ममताबाई हंबर्डे या शांत,स्वभाव,मनमिळाऊपणा आणि घरातील प्रत्येक गोष्टीला सकारात्मक प्रतिसाद देऊन त्यांना सदैव पाठिंबा देणाऱ्या होत्या.शांत समाधानी आणि अध्यात्माची दिशा मुला,मुलींना आणि नातवंडांना त्यांनीच दिली. समता,बंधुत्व आणि एकतेची शिकवण देणाऱ्या ममताबाई हंबर्डे होत्या.धर्म व परंपरांचा अभिमान बाळगणार्‍या होत्या.पांढरीसारख्या ग्रामीण भागांमध्ये राहूनसुद्धा त्या समाधानी होत्या.बंगला, गाड्या,प्रचंड पैसा,दागदागिने याचा कसलाच त्यांना हाव्यास आणि लालसा नव्हती कारण त्या परोपकारी जीवन जगणाऱ्या,गोरगरीबांची सेवा करणाऱ्या स्व.जानदेवबापु हंबर्डे यांच्या पत्नी तर सामाजिक कार्यकर्ते दिलीपदादा हंबर्डे यांच्या माता होत्या.डोके शांत ठेवणाऱ्या,रसाळ वाणी असणाऱ्या,व्यावहारिक जीवनात शांतता महत्त्वाची असते असे विचार असणा-या होत्या.शांतता ही लक्ष्मी घेऊन येते अशा विचाराच्या ममताबाई हंबर्डे होत्या.दिलीपदादा हंबर्डे यांना सामाजिक ,राजकीय क्षेत्रात उतरण्याचा व भविष्यात राष्ट्रीय कार्य करण्याची आणि अध्यात्मिक सेवा घडवण्याची ईश्वराच्या कृपेने शक्ती,बळ मिळो.हीच वै.ममताबाई हंबर्डे यांच्या साक्षीने ईश्वराच्या चरणी प्रार्थना... ममताबाई हंबर्डे यांना भावपुर्ण आदरांजली....

लेखक -उत्तम बोडखे आष्टी.


 

----------------------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या