आष्टी येथील शेतकरी शिक्षण संस्थेच्या नामांकित असलेल्या पं.नेहरू विद्यालयाची आदिती बोडखे
जिल्ह्यात सर्वप्रथम आली आहे.या शाळेने एस.एस.सी.(दहावी) परीक्षेत उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. आष्टी येथील शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पंडित जवाहरलाल नेहरू माध्यमिक विद्यालयाने एसएससी बोर्ड परीक्षेत याहीवर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे.अशी माहिती मुख्याध्यापक तथा प्राचार्य सुरेश बोडखे यांनी दिली.मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल काल जाहीर झाला आहे. पं.जवाहरलाल नेहरू माध्यमिक विद्यालयाचे १८६ विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते.
त्यापैकी ५६ विद्यार्थ्यांनी ९९ टक्क्यापेक्षा जास्त गुण संपादन करून पंडित जवाहरलाल नेहरू माध्यमिक विद्यालयाची आणि शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाची बीड जिल्ह्यात मान उंचावली आहे.या विद्यालयाची विद्यार्थिनी कु.आदिती सुरेश बोडखे हिने १०० टक्के गुण संपादन करून बीड जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम क्रमांक पटकावला आहे. याच विद्यालयातील कु.तनिष्का किरण धोंडे आणि रणजीत सुनील टेकाळे यांनी प्रत्येकी ९९.६० टक्के गुण पटकावून द्वितीय क्रमांक मिळवला तर तृतीय क्रमांक कु. ऐश्वर्या सुनील शिंदे हिने ९९.२० टक्के गुण प्राप्त केले आहेत. फेब्रुवारी २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेमध्ये आष्टी येथील पंडित जवाहरलाल नेहरू कनिष्ठ महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा निकाल ९८.९९ टक्के तर कला शाखेचा निकाल ८७.७५ टक्के तर एच.एस.सी. व्होकेशनलचा निकाल ९९.६६ टक्के असा लागला.विज्ञान शाखेत कु.प्रांजल राहुल टेकाडे ९१.८३ टक्के, कु.हिलेश समाहेर हरेश चाऊस ९१.१७ टक्के, कु.साक्षी अमृत मोहरकर ९०.९३ टक्के, कु.समीक्षा संजय शेंडे ९०.८३ टक्के, कु.स्नेहल सुनील भवर ९०.८३ टक्के तसेच कला शाखेतील कु.
प्रीती उमेश पवळ ८७ .३३ टक्के, कु.अमृता सुभाष गिरी ८१ टक्के ,कु. वैष्णवी सुभाष देशमुख ७९.५० टक्के यांनी घवघवीत यश प्राप्त केले आहे.या सर्व गुणवंत व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आ.भीमराव धोंडे,डॉ.अजयदादा धोंडे,अभयराजे धोंडे,संस्थेचे जेष्ठ संचालक विठ्ठलराव बनसोडे,प्रशासकीय अधिकारी प्राचार्य डॉ.डी.बी.राऊत,प्रा.शिवदास विधाते,दत्तात्रय गिलचे,माऊली बोडखे, सुनील शेंडे तसेच पंडित जवाहरलाल नेहरू माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य सुरेश बोडखे यांनी सर्व शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
------------------------------------------
जयभवानी विद्यालयाची निकालाची
उज्जवल यशाची परंपरा कायम
------------------------------------------
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षामध्ये जळगाव येथील जयभवानी विद्यालयाची उज्जवल यशाची परंपरा कायम आहे.माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२३ या परीक्षा मध्ये एकुण ८९ विद्यार्थी बसले होते त्या पैकी ८७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून विशेष प्राविण्यामध्ये ६४ विद्यार्थी, प्रथमश्रेणी मध्ये २१ विद्यार्थी, द्वितीय श्रेणी मध्ये २ विद्यार्थी आहेत.वारे अक्षता आण्णा. ९२.४० टक्के (प्रथम),पडोळे शिवानी महादेव ९२.,४० टक्के, (व्दितीय),धुमाळ अस्मिता ज्ञानदेव ९१ टक्के (व्दितीय), राऊत यश ईश्वर ९०.६० टक्के (तृतीय ), काळे सुवर्णा पटकीसाहेब. ,९०.६० टक्के (तृतीय) सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आ.भीमराव धोंडे,डॉ.अजयदादा धोंडे, प्रशासकीय अधिकारी डॉ.डी.बी.राऊत,प्रा.शिवदास विधाते,दत्तात्रय गिलचे,माऊली बोडखे,संजय शेंडे,शाळेचे मुख्याध्यापक भीमराव आहेर,दिपक गदादे सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद, सरपंच पोपट गोंडे,उपसरपंच संदीप गदादे, सरपंच अजित घुले,उपसरपंच गणेश पडोळे,सरपंच अशोक पवार, सरपंच जालिंदर नरवडे, सरपंच अशोक मुळे, सरपंच सुभाष माळी, सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी अभिनंदन केले.
------------------------------------------
पोखरी येथील यशवंतराव चव्हाण विद्यालयाचा
१०० टक्के
आष्टी तालुक्यातील शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ आष्टी संचलित यशवंतराव चव्हाण माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालय पोखरी या शाळेचा इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला आहे. या परीक्षेत विद्यालयातून प्रथम कु.योगिता शिवाजी विधाते गुण ९४.४० टक्के, द्वितीय कु.मयुरी लक्ष्मण बांगर गुण ९४.२० टक्के,तर तृतीय कु.तेजस्विनी अंबादास बांगर गुण ९३.८० टक्के मिळवले आहेत.विशेष या परीक्षेत मुलींनीच बाजी मारली आहे.यशवंतराव चव्हाण माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालय हे पोखरी या ग्रामीण भागात असलेली शाळा असून येथे शिक्षण घेत असलेले विद्यार्थी हे सर्व शेतकरी कष्टकरी पालकांचे मुलं आहेत. शाळेव्यतिरिक्त इतर कुठलेही बाहेरचे क्लास या विद्यार्थ्यांना नाहीत.शाळेचे व्यवस्थापन उत्कृष्ठ असल्याने सर्व विद्यार्थ्यांकडे व्यक्तिगत लक्ष देऊन अभ्यास करून घेतल्यामुळे यश संपादन करणं नक्कीच शक्य असल्याचे यातून दिसून येते. या विद्यालयाचे शैक्षणीक कार्य पाहून नुकतेच या विद्यालयास सर्व शिक्षा अभियानांतर्गत नविन १० कॉम्प्युटर, ई-लर्निंग साठी प्रोजेक्टर, अद्यावत फर्निचर सह एक स्वतंत्र कॉम्प्युटर लॅब शिक्षण विभागाने उपलब्ध करुन दिली आहे. पुढील काळात सर्व सुविधा युक्त शाळा म्हणून नावारूपाला येईल हे नक्की.सर्व दहावी बोर्ड परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आ.भीमराव धोंडे ,डॉ.
अजयदादा धोंडे, प्रशासकीय अधिकारी प्राचार्य डॉ.डी.बी.राऊत.,प्रा.शिवदास विधाते, दत्तात्रय गिलचे, माऊली बोडखे, संजय शेंडे,मुख्याध्यापक तथा प्राचार्य के.बी.खाडे सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,पोखरी गावचे सरपंच, उपसरपंच व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी अभिनंदन करुन पुढील उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
------------------------------------
देऊळगाव घाट येथील श्री ज्ञानेश्वर विद्यालयाचा ९७ टक्के निकाल
************************
आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी तालुक्यातील देऊळगाव घाट येथील श्री ज्ञानेश्वर विद्यालयातील इ.१० वी.मधील ३९ पैकी ३८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.या विद्यालयाचा निकाल ९७.४३ टक्के लागला आहे. गणानुक्रमे प्रथम क्रमांक- प्रथम क्रमांक- सुरेकर आकांक्षा संजय ४५५ गुण ९१ टक्के, द्वितीय चैतन्य गोरक्षनाथ ठोंबरे ४४१ गुण ८८.२०टक़्के तॄतीय क्रमांक- ओंकार दिगांबर ठोंबरे ४४० गुण ८८ टक्के मिळाले आहेत.या गुणवंताचे संस्थाध्यक्ष माजी आ.भीमराव धोंडे,संचालक डॉ.
अजय धोंडे,शाळेचे प्राचार्य डॉ.डी.बी.
राऊत, प्रशासकीय अधिकारी प्रा.
शिवदास विधाते,दत्तात्रय गिलचे,माऊली बोडखे,संजय शेंडे, प्राचार्य महादेव दानवे, सरपंच,उपसरपंच,सर्व ग्रामस्थ देऊळगाव घाट ,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवृंद यांनी अभिनंदन केले आहे.
------------------------------------------
नागनाथ माध्यमिक विद्यालयाचा
शंभर टक्के निकाल
--------------------------------------------------
आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी तालुक्यातील शेतकरी शिक्षण संस्थेचे नागतळा येथील नागनाथ माध्यमिक विद्यालयाचा शंभर टक्के निकाल लागला आहे. ग्रामीण व दुर्गम भागातील माध्यमिक विद्यालयाची निकालाची उत्तुंग भरारी घेतली आहे असे प्राचार्य.डॉ.डी.बी.राऊत यांनी सांगितले. यंदाचा दहावी चा निकाल १०० टक्के लागला असून गुणानुक्रमे प्रथम तीन विध्यार्थी वनवे सचिन शांताराम - ४५७ गुण ९१ .४० टक्के ( प्रथम),गर्जे पल्लवी दादासाहेब ४५१ गुण ९०.२० टक्के ( द्वितीय),धस साक्षी राजेंद्र ४४५ गुण,
८९ टक्के ( तृतीय) असा निकाल लागला आहे. या गुणवंताचे संस्थाध्यक्ष माजी आ.भीमराव धोंडे,संचालक डॉ.
अजय धोंडे,शाळेचे प्राचार्य डॉ.डी.बी.
राऊत, प्रशासकीय अधिकारी प्रा.
शिवदास विधाते,दत्तात्रय गिलचे,माऊली बोडखे,संजय शेंडे,सरपंच,उपसरपंच,सर्व ग्रामस्थ नागतळा,खडकवाडी,पांगरा, मोराळा व नाकाडेवाडी, बी.वाय.शिंदे,
प्रा.बनसोडे आर.डी.,प्रा.सुरेश औटे, प्रा.
ए.जी.भोराडे,एस.पी. गदादे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले आहे.
----------------------------------------
मेहेकरी येथील निजाम पटेल विद्यालयाचा १०० टक्के निकाल
********************************
आष्टी तालुक्यातील शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ आष्टी संचलित मेहकरी येथील निजाम पटेल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला आहे. या परीक्षेत विद्यालयातून प्रथम कु. बोडखे तेजल संजय गुण ९५ टक्के (प्रथम), कु. श्रुती पगारे ९४.४० टक्के (व्दितीय),कु. कळसाईत प्रतीक्षा ९४.४० टक्के (तृतीय) तर कु.बोडखे नियती जिजाराम गुण ९३.६० टक्के गुण मिळवले.विशेष म्हणजे या परीक्षेत मुलींनीच बाजी मारली आहे. वर्षा बाळू जगताप ९३.५० टक्के,अस्मिता भीमराव इंदलकर ९२.२० टक्के विशेष प्राविण्य मधील ३७,प्रथम श्रेणी मधील १२,द्वितीय श्रेणी मधील १ आहेत.
निजाम पटेल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय हे मेहेकरी या ग्रामीण भागात असलेली शाळा आहे.येथे शिक्षण घेत असलेले विद्यार्थी हे सर्व शेतकरी कष्टकरी पालकांचे मुलं आहेत. शाळे व्यतिरिक्त इतर कुठलेही बाहेरचे क्लास या विद्यार्थ्यांना नाहीत.शाळेचे व्यवस्थापन उत्कृष्ठ असल्याने सर्व विद्यार्थ्यांकडे व्यक्तिगत लक्ष देऊन अभ्यास करून घेतल्यामुळे यश संपादन करणं नक्कीच शक्य असल्याचे यातून दिसून येते. या विद्यालयाचे शैक्षणीक कार्य पाहून नुकतेच या विद्यालयास सर्व शिक्षा अभियानांतर्गत नविन १० कॉम्प्युटर, ई-लर्निंग साठी प्रोजेक्टर,अद्यावत फर्निचर सह एक स्वतंत्र कॉम्प्युटर लॅब शिक्षण विभागाने उपलब्ध करुन दिली आहे. पुढील काळात सर्व सुविधा युक्त शाळा म्हणून नावारूपाला येईल. सर्व दहावी बोर्ड परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आ.भीमराव धोंडे ,डॉ.अजयदादा धोंडे, प्रशासकीय अधिकारी प्राचार्य डॉ.डी.बी.राऊत.,प्रा.विधाते एस.जी.,दत्तात्रय गिलचे,माऊली बोडखे,संजय शेंडे, मुख्याध्यापक तथा प्राचार्य साईनाथ बोडखे सर्व प्राध्यापक,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,मेहेकरी,पिंपळगाव दाणे,आनंदवाडी,सराटेवडगाव,गावचे सरपंच,उपसरपंच व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी अभिनंदन केले.
------------------------------------------
जनता विद्यालय दहावीच्या
निकालाची उज्ज्वल परंपरा कायम
------------------------------------------
आष्टी (प्रतिनिधी) आष्टी तालुक्यातील धानोरा येथील जनता विद्यालयाचा ९३.१० टक्के निकाल लागला आहे.
विशेष प्राविण्य ८७,प्रथम श्रेणी २०,
द्वितीय श्रेणी १ उत्तीर्ण झाले. शाळेत गुणानुक्रमे आलेले प्रथम चार विद्यार्थी.खान ईशरा कादर ९६.४० टक्के,शेलारसो सोनम आजिनाथ ९५.६० टक्के,काळे आदित्य अशोक ९५.५० टक्के,सय्यद आर्शीया अस्लम ९५.५० टक्के,शिंगटे वैष्णवी भगवान ९४.८० टक्के,शेख
मुस्कान इर्शाद ९४.८० टक्के, मुठे आकांक्षा छगन ९४.८० टक्के या यशस्वी विद्यार्थ्यांचे जनता वस्तीगृह शिक्षण संस्थेचे सचिव माननीय विजयकुमार बांदल,अध्यक्ष सय्यद अब्दुल भाई
व्यवस्थापक विशालभैय्या बांदल, मुख्याध्यापक तथा प्राचार्य उत्तम गव्हाणे , उपमुख्याध्यापक ढोबळे,पर्यवेक्षक सय्यद ए.डी. इयत्ता दहावीला शिकवणारे सर्व शिक्षक, इतर सर्व शिक्षक वृंद लिपिक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
-------------------------------------------
आष्टी येथील गणेश विद्यालयाचा निकाल
----------------------------------------------
आष्टी (प्रतिनिधी) आष्टी शहरातील श्री गणेश विद्यालयाचे २०२३ चे गुणवत्ता विद्यार्थी थोरवे सार्थक स्वानंद -९८.६० टक्के (प्रथम),कु.गवारे अस्मिता विजय ९५.२० टक्के (व्दितीय ) पारेकर कृष्णा पंढरीनाथ ९४.३० टक्के (तृतीय )पवार दिपक अनिल ९३.८० टक्के (चतुर्थ),केरूळकर सुरज संपत ९४.६० टक्के (पाचवा),कु. गर्जे ऋतुजा ज्ञानदेव -९३.५०,(सहावी)कु. गिते निकिता भगवान९३.४० -/(सहावी),गरगडे अंजिक्य चक्रधर ९३.२० (सातवा ),देशमुख ओमराज संतोष ९३ टक्के (आठवा) गणानुक्रमे आले आहेत.९० टक्के पेक्षा जास्त २८ आणि विशेष प्राविण्य मिळविलेले ७८ तर प्रथम श्रेणीत ३२ तर द्वितीय श्रेणीत १३ विद्यार्थ्थी उत्तीर्ण झाले. यशस्वी विद्यार्थ्थीचे मुख्याध्यापक रमेश भगत,सर्व संचालक,शिक्षक यांनी अभिनंदन केले.




0 टिप्पण्या