Ticker

6/recent/ticker-posts

ग्रामीण महिलांनी व्यवसायासह अत्याधुनिक शेती व नोकरी क्षेत्रात आपले स्थान मजबूत करावे ---------- सौ.प्राजक्ताताई धस....



महिलांनी चूल आणि मूल यापुरते मर्यादित न राहता मुलांच्या  शिक्षणाकडे तसेच कौटुंबिक आर्थिक परिस्थितीच्या प्रगती करण्यासाठी महिलांनी पुरुषाच्यांबरोबर आपला संसाराचा गाडा अधिक जोमाने न्यायला पाहिजेत. तसेच आपल्या मुलामुलींच्या शिक्षणासह सोबत संस्काराकडे लक्ष दिले  पाहिजे.तर महिला सर्व क्षेत्रात प्रगती करत असून भारत  देश महासत्ता होण्यासाठी महिलाचा सहभाग महत्त्वाचा आहे. ग्रामीण भागातील महिलांनी व्यवसायासह अत्याधुनिक शेती व नोकरी आदी क्षेत्रात आपले स्थान अधिक मजबूत करणे गरजेचे आहे आणि महिलाचे सक्षमीकरण व सशक्तीकरण करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन महानंदा दूध संघ मुंबई संचालिका सौ.प्राजक्ताताई सुरेश धस यांनी केले.

         आष्टी तालुक्यातील वाकी येथे अहिल्यादेवी होळकर 
जयंतीनिमित्त २६ महिलांचा अहिल्यादेवी होळकर पुरस्कार 
सत्कार सोहळा दैठणा, वाकी, पिंपळसूटी ग्रामपंचायतींच्यावतीने 
आयोजित करण्यात आला होता.यावेळी उज्वला आस्वर, शांताबाई 
बोखारे, शालन कदम, सुनंदा आ्स्वर, द्वारका कोल्हे, छाया कदम, 
कोमल लकडे, सुनीता बावडकर, शबनम काझी, सुरेखा आस्वर,
 स्वाती गहीले, स्वाती कारंजकर, मनीषा कदम, पूजा आस्वर, 
उषा जगदाळे, भारती आस्वर रूपाली कोरडे, चंद्रकला कदम,
 मनीषा खेत्रे, मनीषा खेत्रे, विजूबाई लोंढे, अनिता पगारे, रुकसाना 
शेख, सुनिता खरपुडे, लक्ष्मी कदम, प्रियंका आस्वर, मोनिका सकट
 यांचा सत्कार कक्षण्यात आला.
       पुढे बोलताना सौ.धस म्हणाल्या की, दैठणा वाकी,पिंपळसूटी
 ग्रुप ग्रामपंचायतच्यावतीने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम 
करणाऱ्या २६ महिलांचा पुरस्कार देऊन सन्मान केला महिलांचे 
योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे.महिला अत्यंत धाडसी कामे 
करतात त्याचबरोबर ट्रॅक्टर चालवण्यासारखे धाडसी कामे करतात, 
या गावाचा विकासासाठी आमदार सुरेश धस यांच्या माध्यमातून 
आमचे कायम सहकार्य राहील असे  सांगितले. कार्यक्रम यशस्वी 
करण्यासाठी उपसरपंच सोमनाथ अस्वर, युवानेते संदीप कारंजकर, 
खंडूनाना लांबडे, ग्रामपंचायत सदस्य राहुलभाऊ पवार, आबासाहेब 
पुणेकर, गौतम ससाने, रामनाथ कदम, बाबासाहेब ससाणे , सावता 
आस्वर, लक्ष्मण आस्वर, दिपक खरपुडे,आप्पा कोठे, सतिश अस्वर, 
संदिप अस्वर, प्रकाश आस्वर, अशोक कोरडे, विठ्ठल पवार, 
काकासाहेब पुणेकर,केतन आस्वर,नाझीम सय्यद सुभाष सकट, 
अस्लम सय्यद, सुभम लाबडे, बाळा आस्वर, अमोल कदम यांनी 
परिश्रम घेतले. यावेळी गणपत अस्वर,बबन लोंढे, कुंडलिक अस्वर, 
महादेव पवार, मधूकर लांबडे, तात्याराम लाबडे, राजाबापू आस्वर, 
ज्ञानदेव कोरडे,भरत पवार, रावसाहेब अस्वर, आबासाहेब आस्वर, 
बाजीराव कोरडे, संतोष कोरडे, इशरत सय्यद, मोहन काळे, गोकुळ 
काळे, जालिंदर कोल्हे, अशोक सकट, सतिश सकट, सिताराम 
वाळके, आबासाहेब कोठे, आकाश पाटील, विठ्ठल लकडे, 
आजिनाथ आस्वर, अशोक अस्वर, शहाजी अस्वर, अभिजीत काळे,
 शहाजी लोंढे, सुनिल आस्वर, शरद खोटे, बद्रीनाथ आस्वर,


 नंदकुमार ससाणे, ज्ञानेश्वर ससाणे, आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या