आष्टी तालुक्यातील कासारी येथील जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक बापुसाहेब बंडुजी भापकर ( वय ९४ ) यांचे वृद्धापकाळाने मंगळवारी निधन झाले.रात्री ९ वा.कासारी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यां
च्यापाठीमागे सतीष भापकर ,कल्याण भापकर आणि राजु भापकर हे तीन मुले व सुना, नातंवंडे असा मोठा परिवार आहे.यावेळी माजी आ.साहेबराव दरेकर, डॉ.विलासराव सोनवणे, आण्णासाहेब चौधरी, विठ्ठल मुटकुळे, प्राचार्य , प्राध्यापक, सामाजिक,राजकीय, धार्मिक व महसुल क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.आष्टी तालुका पत्रकार संघाचे वतीने श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

0 टिप्पण्या