आष्टी तालुका मराठा सेवा संघाची नवीन कार्यकारिणी नुकतीच प्रदेश कार्याध्यक्ष अर्जुनराव तनपुरे यांनी येथे जाहीर केली.मराठा सेवा संघाच्या आष्टी तालुकाध्यक्षपदी इंजि.तान्हाजी (बाप्पू) जंजिरे यांची एकमताने निवड झाली.इतर पदाधिकारी व सदस्य पुढील प्रमाणे निवडण्यात आले आहेत.लक्ष्मण रेडेकर (उपाध्यक्ष) भास्कर निंबाळकर (सचिव), सुरेश पवार (सहसचिव),बन्सीधर (बापु) मोरे (कोषाध्यक्ष), इंजि.पी.ई. तळेकर (आप्पा) (संघटक) डॉ.दत्तात्रय नरसाळे ( प्रवक्ता ), प्रा.डॉ. बाबासाहेब मुटकुळे (समन्वयक), शरद कदम (सदस्य) सदरची कार्यकारिणी आष्टी येथील जिजाऊ राजमाता वसतिगृहासाठी काम करेल.यावेळी मराठा सेवा संघाचे बीड जिल्हाध्यक्ष अशोक ठाकरे, प्राचार्य शशिकांत कन्हेरे,रघुनाथ आवारे व इतर सदस्य मोठ्या



संख्येने उपस्थित होते.