Ticker

6/recent/ticker-posts

डॉ.राजेंद्र सानप यांना ग्रंथमित्र पुरस्कार खा.शरद पवार यांचे हस्ते प्रदान..


महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस ग्रंथालय विभागाच्यावतीने 
२०२३ चा शरदचंद्र पवार ग्रंथमित्र पुरस्कार बीड येथील 
गुरुवर्य भगवान महाराज सार्वजनिक वाचनालय इंद्रप्रस्थ 
काॅलनी बीडचे ग्रंथपाल व बीड जिल्हा ग्रंथालय संघाचे 
अध्यक्ष डॉ.राजेंद्र सानप यांना जाहीर झाला होता. दि.
१६ जुन रोजी अंमळनेर (जि.जळगाव) येथील शिवाजी 
महाराज नाट्यगृह येथे राष्ट्रवादी काँग्रेस ग्रंथालय 
विभागाच्या प्राशिक्षण शिबीरात राष्ट्रवादी काँग्रेस 
पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार यांचे हस्ते
 डॉ.राजेंद्र सानप यांना ग्रंथमित्र पुरस्कार देण्यात 
आला यावेळी रा .काॅ. प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील 
विधानसभा विरोधी पक्षनेते ना. अजीतदादा पवार,
माजी विधानसभा अध्यक्ष अरूणभाई गुजराथी,
माजी मंत्री आ.एकनाथ खडसे,आ.अनिल पाटील,
रा.काॅ. ग्रंथालय विभाग प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील,
महाराष्ट्र समन्वयक सौ.रिताताई बाविस्कर यांच्या 
प्रमुख उपस्थितीत पुरस्कार वितरित करण्यात आले. 
या कार्यक्रमास माजी आ. अनिल गोटे, माजी आ.
साहेबराव पाटील,मा.खा. मोरे, अविनाश आदीक,
 सुरज चव्हाण,माजी मंत्री गुलाबराव देवकर ,ग्रंथालय 
विभागाचे प्रदेश पदाधिकारी अक्रुर सोनटक्के,प्रशांत 
लोंढे,यांच्यासह असंख्य मान्यवर व रा .काॅ .ग्रंथालय
 विभागाच्या हजारो पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या 
उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. बीड जिल्हातुन 
जिल्हा ग्रंथालय संघ संचालक रामदास नागरगोजे,

डॉ.राजेंद्र


शेख इब्राहिम,बंडु घोशीर, धनंजय सानप उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या