आष्टी येथील शेतकरी शिक्षण संस्थेच्या नामांकित असलेल्या पं.नेहरू विद्यालयाची आदिती बोडखे
जिल्ह्यत सर्वप्रथम आली आहे.या शाळेने एस.
एस.सी. (दहावी) परीक्षेत उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. आष्टी येथील शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पंडित जवाहरलाल नेहरू माध्यमिक विद्यालयाने एसएससी बोर्ड परीक्षेत याहीवर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे.अशी माहिती मुख्याध्यापक तथा प्राचार्य सुरेश बोडखे यांनी दिली.मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल काल जाहीर झाला आहे. पं.जवाहरलाल नेहरू माध्यमिक विद्यालयाचे १८६ विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते.त्यापैकी ५६ विद्यार्थ्यांनी ९९ टक्क्यापेक्षा जास्त गुण संपादन करून पंडित जवाहरलाल नेहरू माध्यमिक विद्यालयाची आणि शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाची बीड जिल्ह्यात मान उंचावली आहे.या विद्यालयाची विद्यार्थिनी कु.आदिती सुरेश बोडखे हिने १०० टक्के गुण संपादन करून बीड जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम क्रमांक पटकावला आहे. याच विद्यालयातील कु.तनिष्का किरण धोंडे आणि रणजीत सुनील टेकाळे यांनी प्रत्येकी ९९.६० टक्के गुण पटकावून द्वितीय क्रमांक मिळवला तर तृतीय क्रमांक कु. ऐश्वर्या सुनील शिंदे हिने ९९.२० टक्के गुण प्राप्त केले आहेत. फेब्रुवारी २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेमध्ये आष्टी येथील पंडित जवाहरलाल नेहरू कनिष्ठ महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा निकाल ९८.९९ टक्के तर कला शाखेचा निकाल ८७.७५ टक्के तर एच.एस.सी. व्होकेशनलचा निकाल ९९.६६ टक्के असा लागला. विज्ञान शाखेत कु.प्रांजल राहुल टेकाडे ९१.८३ टक्के, कु.हिलेश समाहेर हरेश चाऊस ९१.१७ टक्के, कु.साक्षी अमृत मोहरकर ९०.९३ टक्के, कु.समीक्षा संजय शेंडे ९०.८३ टक्के, कु.स्नेहल सुनील भवर ९०.८३ टक्के तसेच कला शाखेतील कु.प्रीती उमेश पवळ ८७ .३३ टक्के, कु.अमृता सुभाष गिरी ८१ टक्के ,कु. वैष्णवी सुभाष देशमुख ७९.५० टक्के यांनी घवघवीत यश प्राप्त केले आहे.या सर्व गुणवंत व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आ. भीमराव धोंडे,डॉ.अजयदादा धोंडे,अभयराजे धोंडे,संस्थेचे जेष्ठ संचालक विठ्ठलराव बनसोडे,प्रशासकीय अधिकारी प्राचार्य डॉ.डी.बी.राऊत,प्रा.शिवदास विधाते, दत्तात्रय गिलचे,माऊली बोडखे, सुनील शेंडे, पंडित जवाहरलाल नेहरू माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य सुरेश बोडखे यांनी सर्व शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.




0 टिप्पण्या