Ticker

6/recent/ticker-posts

अध्यात्मिक नैतिक मूल्य जपून जगाच्या प्रांगणात प्रवास करावा --- ह.भ.प.शंकर महाराज शेवाळे




 आज परमार्थ, धर्म ,विज्ञान आणि अध्यात्म या सर्वांची सांगड घालून युवकांनी आगामी काळामध्ये विकासाचा ध्यास घेऊन अध्यात्मिक नैतिक मूल्यांची जपणूक करत जगाच्या प्रांगणात प्रवास करावा असे आवाहन 

भीमाशंकर येथील ह.भ.प.शंकर महाराज शेवाळे यांनी केले.आष्टी येथील ज्ञानेश्वर माऊली महाराज चाकरवाडीकर यांच्या २३ व्या पुण्यतिथीनिमित्त आगमन झाले असता.आष्टी येथील बोडखे प्रेस येथे पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना ते बोलत होते.यावेळी दिनकरराव तांदळे महाराज,हौसराव आजबे महाराज, धोंडीराम जाडे उपस्थित होते.आष्टी येथील माऊली मंदिरात संत ज्ञानेश्वर माऊली चाकरवाडीकर यांच्या २३ व्या.पुण्यतिथीनिमित्त आणि संत नामदेव महाराज यांच्या सप्त शत्तकोत्तर सुवर्ण महोत्सवी जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त अखिल भारतीय वारकरी मंडळ प्रेरीत भव्य अखंड हरिनाम सप्ताहातील ह.भ.प.शंकर महाराज शेवाळे यांची सुश्राव्य संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या चरित्रकथा सुरु आहे.शेवाळे महाराज पुढे म्हणाले की, आपण गेली २० वर्षे परमार्थात काम करत असून भीमाशंकर येथे आश्रम स्थापन केला आहे.त्याठिकाणी रस्त्यावरील,निराधार,वृद्धांचा सांभाळ करत असून गोशाळा चालवत आहे.आजपर्यंत जगद्गुरू तुकोबारायांच्या जीवनावरील... "तुका आकाशा एवढा "आणि संतश्रेष्ठ ज्ञानोबारायांच्या जीवनावरील " इंद्रायणी काठी " हे जीवन चरित्रांवरील अनेक कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रात करण्याची संधी मला प्राप्त झाली आहे. अध्यात्माबरोबरच व्यक्तिमत्व विकास, वेळेचे नियोजन, ताण तणाव मुक्ती आणि मानवी जीवनाचा विकास याबाबत आपण काम करत आहोत तसेच परमार्थाचा विचार नवीन पिढीच्या हृदयामध्ये रुजवावा समाज रचनेच्या हृदयामध्ये रुजवावा तसेच कालांतराने विकास आणि विनाश हे जगाच्या बाजारात हातात हात घालून चालत असल्यामुळे परमार्थ आणि धर्म आणि धर्मानुषंगाने आचरण करणे ही काळाची गरज बनलेली असून युवकांनी धर्माधिष्ठित विचारसरणी दैनंदिन जीवनात आचरण्याची गरज निर्माण झालेली आहे.प्राचीन असलेल्या हिंदू धर्मामध्ये अनेक रूढी आणि परंपरा असून अनेक जातीमध्ये जन्मलेल्या संतांनी धर्म जागरणाचे काम करून सनातन हिंदू धर्म सर्वसामान्य लोकांना समजावण्याचा प्रयत्न केला आहे परंतु आज दुर्दैवाने 

अशी परिस्थिती आहे की,संत नामदेव महाराज हे शिंपी,संत चोखोबा दलित, संत सावताबाबा माळी,संत गोरोबाकाका कुंभार अशा पध्दतीने या संतांना 

आपापल्या जातीने वाटून घेतल्याने समाज विखरला 

जात आहे.याचे भान नव्या पिढीने ठेवण्याची गरज आहे. कोणत्याही संतांना जात आणि पात नसते.संत हे सर्व जातींचे असतात सर्व संतांनी." खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे.." 

असेच सांगितल्याने मानवी जीवनाच्या उत्थानासाठी सर्व जातीपातीतील संतांनी आपल्या कार्यातून सर्व जनता जनार्दनाला पंढरपूरच्या पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होण्याची शिकवण दिली.त्यानुसार आपणही युवकांना इतिहास आणि विज्ञानाची सांगड घालून आधुनिक पद्धतीने अभंग आणि आधुनिक तंत्रज्ञानाने सनातन धर्म विषयीचे अध्यात्मिक ज्ञान संपादन करण्यासाठी संधी निर्माण करून देण्याचा प्रयत्न करत आहोत असे सांगत.त्यांनी आज सनातन धर्मावर आघात करण्याचे अनेक प्रयत्न होत आहेत. त्यामुळे आगामी काळात युवकांनी अत्यंत जागृत होऊन अध्यात्मिक आणि नैतिक मूल्य जपून जगाच्या प्रांगणात चालावे..त्यातूनच आधुनिक भारत घडणार आहे. याची जाणीव देखील युवकांनी ठेवावी असे आवाहनही त्यांनी शेवटी केले तसेच संत नामदेव महाराजांच्या ७५० व्या. जयंतीनिमित्त विविध ७४९ ठिकाणी संत नामदेवांच्या कथा कार्यक्रम आयोजित केले असून ७५० वा कथेचा कार्यक्रम पंढरपूर येथे करून या ठिकाणी कथेचा समारोप होणार आहे असे सांगितले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या