आठराव्या शतकात तात्कालीन अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा एक महिला असूनही सामाजिक धार्मिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये त्यांनी केलेले खडतर कार्य आजही त्यांच्या व्यापक बुद्धीचातुर्याची साक्ष देते. त्यांचे संबंध कार्यकर्तृत्व कृतिशील समाज सुधारकाचे होते!' असा गौरव नेट, सेट, पीएचडी धारक संघर्ष समितीच्या बीड जिल्हा समन्वयक तथा हिंदी साहित्यिक प्रा.आशा फड- चाटे यांनी केला.महाराष्ट्र राज्य नेट, सेट,पीएचडी धारक संघर्ष समितीच्या वतीने लोकमाता राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्यकर्तृत्वावर अंबाजोगाई येथे प्रकाश टाकताना गजराई पार्क येथे प्रा. आशा फड- चाटे बोलत होत्या. अध्यक्षस्थानी श्रीमती मुंडे होत्या. प्रारंभी राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले.प्रा.फड चाटे पुढे म्हणाल्या,अहिल्याबाई होळकर यांनी तात्कालीन स्थितीत रस्ते, मंदिरे, विहीरि, तलाव, वृक्षारोपण, स्त्री पुरुष समानता, सर्व धर्म समभाव आदी सह शाश्वत विकासाची कार्य केले. घोड्यावर बसून देश व राज्याच्या भविष्यातील हितासाठी प्रचंड कष्ट केले. त्या खऱ्या अर्थाने कृतीशील समाज सुधारक होत्या. स्त्री समाजासाठी आणि संबंध मानवी हितासाठीच त्यांचे जीवन चरित्र आणि सबंध कार्य अखंड प्रेरणास्त्रोत ठरेल, असा विश्वासही त्यांनी अनेक उदाहरणासह व्यक्त केला.

0 टिप्पण्या