Ticker

6/recent/ticker-posts

स्व-कष्टातून उमजलेलं असामान्य नेतृत्व - लोकनेते गोपीनाथराव मुंडे


अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ग्रामीण भागातून कसलाही वारसा नसताना ग्रामपंचायत सदस्य, महाविद्यालयाच्या वर्ग प्रतिनिधी पासून ते थेट देशाच्या ग्रामविकास मंत्र्यापर्यंत मारलेली मजल ही त्यांच्या केवळ आणि केवळ स्व कष्टातून आणि प्रचंड राजकारणाच्या बुद्धी चातुर्यातून मिळवलेली आहे.लोकशाही व्यवस्थेतील राजकारण हा अविभाज्य घटक आहे. तुम्हाला आवडो न आवडो या प्रक्रियेत सहभागी प्रत्यक्ष प्रत्यक्ष व्हावेच लागते. त्या अनुषंगाने राजकारण पारदर्शक सर्वसामान्य जनतेच्या हिताचे झाले पाहिजे ही फार कमी नेतृत्वाची मानसिकता असते. गोपीनाथजी मुंडे हे अत्यंत सामान्य कुटुंबातून आणि खेडेगावातून आल्याने सर्वसामान्यांची दुःख वेदना जाणीव संवेदना त्यांची पुरेपूर त्यांना जाणीव होती.


महाविद्यालयाचा वर्ग प्रतिनिधी ग्रामपंचायतचे सदस्य ते उपमुख्यमंत्री, केंद्राचे ग्रामीण विकास मंत्री असा त्यांचा प्रवास हा कुठल्याही यशस्वी कार्यकर्त्यांना सातत्याने अनुभवण्यासारखा आहे. ज्याला यश मिळवायचे राजकारणात त्याने गोपीनाथ मुंडे यांच्या चरित्र आणि कार्य आत्मसात करावे.आयत्या पिठावर रेगा मारणारे अर्थात राजघराण्याचा वारसा घेऊन राजकारणात उभारलेले अनेक जण असतात पण मुंडे साहेबांचे हे नेतृत्व त्यांनी गोरगरिबांसाठी शेतकऱ्यांसाठी कामगारांसाठी वंचित बेरोजगारांसाठी महिलांसाठी प्रौढांसाठी युवकांसाठी तसेच गुन्हेगारी संपवण्यासाठी केलेले कायदे हे त्यांच्या उत्कृष्ट ग्रह मंत्री पदाची कायम स्मरण राहण्यासारखे आहे.शेतकरी हा व्यवस्थेचा कुठल्याही महत्त्वपूर्ण घटक असतो म्हणूनच त्यांनी डोंगराळ भागामध्ये केलेले साठवण तलाव आजही शेतकऱ्यांना दुष्काळ मुक्ती पासून दूर नेण्यास मदत करतात. त्यांच्या काळात झालेल्या अनेक सूशिक्षित बेरोजगारांसाठीच्या भरत्या शेतकऱ्यांसाठी घेतलेले निर्णय कायमस्वरूपी संस्मरणीय आहेत. त्यांच्यातील साधेपणा झोपडीत जाऊन दुःख अश्रू पुसण्याची त्यांची किमया ही जगावेगळी आहे म्हणूनच सर्व जाती धर्मपंथांसाठी लोकनेते गोपीनाथराव मुंडे हे सावली असायचे गोपीनाथ मुंडे म्हणूनच लोकनेते ही पदी फक्त काही मोजक्या लोकांना शोधते त्यात गोपिनाथराव मुंडे अग्रस्थानी ठरतील लोकनेते या शब्दाची खऱ्या अर्थाने उंची गोपीनाथराव मुंडे यांच्यामुळे वाढली आहे.अशा या उच्च विचारसरणीच्या आणि प्रचंड कार्यक्षमतेच्या लोकनेतृत्वाला दृष्ट लागली. नियतीला हे पाहणे शक्य झाले नाही. 'जो आवडे सर्वांना तोच आवडे देवाला' या संतांच्या उक्तिनुसार अगदी चालता बोलता मुंडे साहेबांना आपल्या सर्वातून जावे लागले. ही हानी फक्त विशिष्ट गटाची, पक्षाची, कुटुंबाची नाही तर संबंध बीड जिल्ह्याची मराठवाड्याची महाराष्ट्राची आणि संपूर्ण हिंदुस्तानची आहे.तीन जून हा दिवस सबंध देशवाशींयासाठी एका दुःखाच्या आठवणीने व्याकुळ करणाऱ्या दिवसाची आहे. मुंडे साहेबांचे चरित्र आणि कार्य चंद्र सूर्य असेपर्यंत सर्व स्तरातील आणि राजकारणातील व्यक्तींना विद्यापीठासारखे ज्ञान घेण्यासाठी पुरून उरेल! गरिबांचे सावली असलेले सर्वांचे लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या पुण्यस्मरणा निमित्त  विनम्र अभिवादन..!

----  प्रा.बिभिषण चाटे
--------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या