Ticker

6/recent/ticker-posts

संत संगतीतील आनंद शाश्वत आणि चिरंतन असतो - माजी आमदार भीमराव धोंडे .....-

संत श्रेष्ठ नामदेव महाराजांनी आपल्या आयुष्यभर तमाम मानवी समाज हितासाठी दैदिप्यमान धार्मिक कार्य केले. त्यांचे संबंध जीवन सूर्य चंद्र असेपर्यंत संस्कारक्षम समाज निर्मितीसाठी मार्गदर्शन करणारे राहील असा गौरव करत माऊली महाराजांचे अखंड जीवन कार्य संबंध बीड जिल्हा वाशिम साठी कायम मोठी ठेव आहे असे प्रतिपादन आष्टी पाटोदा शिरूर चे लोकप्रिय माजी आमदार तथा शिक्षण महर्षी भीमरावजी धांडे यांनी केले.आष्टी येथील माऊली मंदिरात संत ज्ञानेश्वर माऊली चाकरवाडीकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त आणि संत  नामदेव महाराज यांच्या सप्त शत्तकोत्तर सुवर्ण महोत्सवी जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त अखिल भारतीय वारकरी मंडळ प्रेरीत भव्य अखंड हरिनाम सप्ताहातील ह.भ.प.शंकर महाराज शेवाळे यांची सुश्राव्य संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या चरित्रकथेस माजी आ.भीमराव धोंडे आवर्जून उपस्थित होते त्यावेळी आपल्या मनोगतात श्रीयुत भीमरावजी धोंडे बोलत होते. मंचावर ह.भ.प.रामकृष्ण रंधवेबापू,निवृत्ती महाराज बोडखे,बलभीम सुंबरे, दिनकरराव तांदळे महाराज,पत्रकार उत्तम बोडखे,अशोक डोके हे उपस्थित होते.सातत्याने धार्मिक सामाजिक वैचारिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये स्वतःला सामावून घेत रमण होणारे भीमरावजी धोंडे हे या धार्मिक कार्यक्रमासाठी एक तास अगोदर उपस्थित राहिले संयोजकाच्या वतीने माजी आमदार भीमराव धोंडे यांचा सत्कार करण्यात आला.माजी आमदार भीमराव धोंडे म्हणाले ह भ प माऊली महाराज चाकरवाडीकर यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने या मंदिरात सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त संत नामदेव महाराज सुवर्ण महोत्सवा निमित्ताने संत नामदेव महाराज सुवर्ण महोत्सवी अखंड हरिनाम सप्ताहामध्ये कीर्तन प्रवचन भजन आदी सह धार्मिक उपक्रमांमध्ये सर्व समाजातील भाविक भक्तांनी मोठा सहभाग नोंदवला.



मनुष्य संस्कारक्षम निर्मितीसाठी तसेच धर्म प्रेम राष्ट्रप्रेम समाज प्रेम निर्माण करण्यासाठी संतांचे विचार आत्मसात करणे हीच आजची गरज आहे या अखंड हरिनाम सप्ताह सोहळा विविध संत सज्जनांनी घडवून आणलेले ज्ञान कार्य खरोखर कौतुकास्पद असल्याचे माजी आमदार भीमराव धोंडे यांनी सांगितले.संयोजकाच्या वतीने या आध्यात्मिक कार्यासाठी फार मोठे परिश्रम घेण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या