उत्तम बोडखे,आष्टी.
------------------------------------------------------------------------
सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी या राज्यात निर्णय घेतले जात आहेत.
महाराष्ट्र हे राज्य छत्रपती शिवाजी महाराज आणि लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या विचाराने चालणारे राज्य आहे असे रोखठोक प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
आज बुधवारी अहिल्यादेवींचे जन्मस्थळ श्रीक्षेत्र चौंडी येथे लोकमाता अहिल्यादेवी यांच्या जयंतीच्या निमित्ताने राज्यभरातून जनसागर उसळला
त्या अफाट जनसागराला संबोधित करताना मंचावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पालकमंत्री राधाकृष्ण विखे,खा.सुजयदादा विखे,खा.सदाशिव लोखंडे, संयोजक माजी मंत्री राम शिंदे,आ.गोपीनाथ पडळकर, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे,आ.बबनराव पाचपुते,आ.मोनिकाताई राजळे,आ.सुरेश धस, माजी आ.भीमराव धोंडे,आमदार, खासदार उपस्थित होते.प्रारंभी लोकमाता अहिल्यादेवींच्या भव्य प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.अहिल्या देवीच्या घोषणांनी परिसर दनाणून गेला.मुख्यमंत्री शिंदे
यांनी आपल्या भाषणात राज्यातील विविध कामांच्या अनुषंगाने घोषणा केल्या.
आज पवित्र दिवस असून अहिल्या देवीच्या जन्मस्थळात त्यांना अभिवादन करण्याची संधी मुख्यमंत्री म्हणून भेटली, याचा आनंद आहे. अहिल्यादेवी
चे कार्य हिमालया एवढे असून त्यांच्या शाश्वत चिरंतन कार्य आपल्या सर्वांना सदैव प्रेरणादायी राहील असा विश्वास आहे.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहिल्यादेवींचे कार्य संदर्भात विस्तृत भाषण केले राजकीय सामाजिक विषयावर भाष्य करत राज्य सरकारच्या वतीने यापूर्वी अनेक मोठे निर्णय घेतल्या असून औरंगाबादचे संभाजीनगर तसेच अहमदनगरचे अहिल्यानगर हे निर्णय मोठे असल्याचे ते म्हणाले.सकाळपासून चौंडीच्या दिशेने राज्यभरातून कार्यकर्ते आणि युवकांचे जत्थे येत होते अहिल्यादेवींच्या
चरणी नत मस्तक होण्यात सर्वांनी धन्यता मानली. चोंडीच्या भविष्यातील विकासाच्या दृष्टीने पावले उचलली जातील असा विश्वास सर्वसामान्यांना
वाटत होता.दरम्यान,या सभेनंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी
बेरोजगारीच्या प्रश्नावर ठोस निर्णय घेऊन लाखो तरुण बेरोजगारीच्या खाईत सापडलेले असल्याने लवकरच विविध खात्यात प्रत्यक्षात भरती करून न्याय द्यावा अशा प्रतिक्रिया उमटत होत्या.या ठिकाणी आयोजित जाहीर कार्यक्रमात जिल्ह्यातील १४ तालुक्यातील महिलांना राजमाता अहिल्यादेवी सन्मान करण्यात आला.यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले
की आगामी ३०० जयंती ही मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. अहमदनगरचे नवीन नाव हे बदलून अहिल्यादेवी होळकरनगर असे
करणार करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.
अहिल्यादेवी महामंडळाला राज्य सरकारच्यावतीने १० कोटी रुपये देण्यात आली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.यावेळी बोलताना
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस म्हणाले की,मी सरकारने धनगरांसाठी
विविध योजनांना मंजुरी दिली आहे.अहिल्यादेवी होळकर यांचे नाव सांगणाऱ्या प्रत्येकाने संघर्ष करायला हवा. राज्य हे राजमाता अहिल्यादेवी होळकर आणि शिवाजी महाराज यांच्यासारखे चालवत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितलं.विधान परिषद सदस्य राम शिंदे यांनी अहमदनगरचे
नाव बदलण्याची मागणी केली होती.
0 टिप्पण्या