Ticker

6/recent/ticker-posts

लोकनेत्या पंकजाताई मुंडे मंत्री ; तर भीमराव धोंडे आमदार व्हावेत,यासाठी कलावंताचा माहूरगडच्या देवीस नवस!*

      'एखाद्या नेत्यावर अत्यंत सामान्य कुटुंबातील सर्वसामान्य युवक किती प्रेम करतो याचे उत्तम उदाहरण आष्टीत आढळले असून पंकजाताई मुंडे या मंत्री व्हाव्यात तर भीमराव धोंडे आमदार व्हावेत यासाठी एका गरीब कुटुंबातील सर्वसामान्य युवक कलावंताने संकल्प पूर्तीपर्यंत अनवाणी राहण्याचा आणि माहूरच्या रेणुकादेवी नवस केल्याची घटना प्रत्ययास आली आहे.भरत चव्हाण हा आष्टी शहरातील गोंधळी समाजातील तरुण कलावंत आहे पंकजाताई या लोकनेत्या आहेत. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचा सक्षम वारसा चालवण्याची धमक आणि कुवत त्यांच्यात आहे.सर्वसामान्यांचे प्रश्न त्या सोडू शकतात.या विचारमालेतून त्या मंत्री व्हाव्यात अशी त्याची अपेक्षा आहे तर आष्टी, शिरूर, पाटोदा विधानसभा मतदार संघाचे शिक्षण महर्षी माजी आमदार भीमराव धोंडे हे अत्यंत संयमी शांत,ऋषितुल्य व्यक्तिमत्व असून विकासाची गंगा त्यांच्या माध्यमातून येऊ शकते अशी भरतसह लाखो युवकांची भावना आहे.भरत चव्हाणने या दोन्ही नेतृत्वाला संधी प्राप्त व्हावी. यासाठी नांदेड जिल्ह्यातील माहूरगडच्या रेणुका देवीस नवस केला आहे.तसेच संकल्पपुर्ती होईपर्यंत पायात चप्पल,पायतान,  न घालण्याचाही त्याचा निर्धार आहे.कडा,पाटोदा बाजार समिती निवडणूक निमित्ताने आष्टीत पंकजाताई आल्या असता भरत आवर्जून त्यांना भेटला. सहा महिन्यापूर्वी भरत हा नवस बोललेला आहे . अलिकडे अचानक पंकजाताई माहूरगड देवी दर्शनासाठी आल्या तेव्हाही योगायोगाने भरत चव्हाण आणि पंकजाताईंची माहूरगड येथे भेट झाली.मंदिरातील या वैशिष्ट्यपूर्ण भेटीत या संकल्पावर भरत कायम राहिला.आष्टीतही भेटून भरतने पायात तोपर्यंत चप्पल न घालण्याची केलेली प्रतिज्ञा तो आजपर्यंत त्यावर ठाम असून या आगळावेगळ्या निर्धाराची आणि सर्वसामान्य कुटुंबीयांतील कलावंतांचे युवकांचे प्रेम लोकनेत्या पंकजाताई आणि भीमराव धोंडे यांच्यावर कायम आहे हे या प्रातिनिधिक कळवळीतून दिसून येते.दरम्यान,या सर्वसामान्य कुटुंबातील कलावंत भरत चव्हाणच्या या नवसाची आणि पायात वाहन न घालण्याची भीष्म प्रतिज्ञाची चर्चा बीड जिल्ह्यासह आष्टी, पाटोदा,शिरूर तालुक्यामध्ये सर्वत्र होताना दिसत आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या