Ticker

6/recent/ticker-posts

आष्टी तालुक्यातील पिंपरीघुमरी येथे "एक लेक एक झाड "उपक्रम

आष्टी तालुक्यातील पिंपरीघुमरी गावातील लग्न होवुन ज्या मुली सासरवसीनी सासरी गेल्या आहेत.त्या सर्व मुलीच्या नावाचे " एक लेक एक झाड " हा उपक्रम राबविण्यात येत आहे.वृक्षरोपनाची अनेक फायदे आहेत.यामुळे झाडाकडे पाहीले की प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीला मुलीची आठवण होणार आहे.गावातील तरुण एकत्र येऊन हा उपक्रम राबविण्याचा निर्णय झाला आहे.यापूर्वी कर्जत शहरात हा उपक्रम राबविण्यात आला आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजुने लेकीचे झाड पाहण्यास मिळते.पिंपरीघुमरी येथे लेकीच झाड माहेरी लावताना या उपक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी सरपंच दादा पांडुळे,माजी सरपंच रुक्मिणीताई  पांडुळे,लेकी वैशाली परकाळे, मनीषा परकाळे,आशा उढाणे मुलगी अश्विनी क्षीरसागर, शिक्षक दिलिप उढाणे,अशोक परकाळे,वारुळे सर लेकिचे झाड माहेरी ही संकल्पना राबविण्यासाठी अमोल उढाणे,फौजी सोपान नरवडे ,फौजी प्रशांत जगताप,नवनियुक्त पोलीस सौरभ परकाळे,किरण गोरे,कानिफनाथ परकाळे,नितिन उढाणे, किशोर क्षीरसागर,मेहमूद शेख,गहिनीनाथ गोरे आदि परीश्रम घेत आहेत.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या