आष्टी तालुक्यातील घाटापिंपरी येथे गुरुवर्य संत मदन महाराज बिहाणी यांच्या आशीर्वादाने ह.भ.प.बबन महाराज बहिरवाल यांच्या प्रेरणेतून सप्ताह झाला.सप्ताहात ह.भ.प.भागवताचार्य संतोष महाराज मोरे यांची संगीत भागवत कथा झाली.आज ह.भ.प.बबन महाराज बहिरवाल यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे.या सप्ताहात काकडा भजन,विष्णु सहस्त्रनाम,गीतापाठ,पसायदान,ज् ञानेश्वरी पारायण,गाथाभजन,संगीत भागवत कथा,हरिपाठ,हरिकीर्तन,जागर (संगीत भजन) आदी धार्मिक कार्यक्रम झाले.या सप्ताहात ह.भ.प.रघुनाथ महाराज चौधरी ,ह.भ.प.पांडुरंग महाराज उगले ,युवा किर्तनकार अक्षय महाराज उगले, ह.भ.प.पुरुषोत्तम महाराज बावस्कर ,ह.भ.प.भागवताचार्य दत्तात्रय महाराज हुके,राष्ट्रीय शिवचरित्रकार ह.भ.प.प्रा.डॉ.गजानन महाराज समाजप्रबोधनकार ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर ) ,ह.भ.प.रामायणाचार्य श्रीनिवास महाराज घुगे यांचे कीर्तन झाले.आज गुरुवार दि.२५ मे रोजी सकाळी ग्रंथराज ज्ञानेश्वरी,अभंगगाथा,श्रीमद भागवत,गुरुवर्य संत मदन महाराज यांच्या प्रतिमेची आणि ह.भ.प.बबन महाराज बहिरवाल महाराज यांची टाळ-मृदंग,ढोल-लेझीम व बॅण्डपथकासह भव्य मिरवणूक होणार आहे.आज गुरुवार दि. २५ मे रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत संत मदन महाराज संस्थान कडा व गुरुकुल आश्रम धामणगांवचे अध्यक्ष ह.भ.प.बबन महाराज बहिरवाल यांचे काल्याचे सुश्राव्य हरिकिर्तन होणार आहे.त्यानंतर महाप्रसादाची पंगत होईल.

0 टिप्पण्या