आष्टी तालुक्यातील ऊसतोड कामगार बहुल पट्ट्यातील खिळद हे एक गाव आहे.खिळद गावातील चौघांनी पोलीस भरतीचे स्वप्न पूर्ण करत चौकार मारला आहे.तालुक्यातील खिळद हे ऊसतोड मजूरांचे आणि शेतकऱ्यांचे गाव असले तरी बहुसंख्य युवक शिक्षणामुळे प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहेत.गावातील जि.प. शाळेत शिकलेल्या चौघांनी वेगवेगळ्या ठिकाणच्या पोलीस भरतीत यश मिळवले आहे.विकास भुजंग वनवे हा युवक एमबीएच्या शेवटच्या वर्षात शिकत आहे.
अहमदनगर येथील मास्टर माईंड अकॅडमीतून पोलीस भरतीचे प्रशिक्षण घेत त्याने मुंबई पोलीस दलात स्थान मिळवले आहे.कड्यातील आनंदराव धोंडे महाविद्यालयातुन तो बी.ए.चा झाला आहे.विकास बाळासाहेब गर्जे हासुद्धा याच महाविद्यालयात बी.ए.च्या द्वितीय वर्षाला शिकत आहे.त्याने संभाजीनगर (औरंगाबाद) येथील भाऊसाहेब गर्जे यांच्या बीएमजी अकॅडमीमधून पोलीस भरतीचे प्रशिक्षण घेतले.सोलापूर शहर पोलीस दलात त्याची निवड झाली आहे.गर्जे याचे वडील ऊसतोड कामगार आहेत.निखिल आश्रुबा गर्जे हा देखील खिळदमधील रहिवाशी आहे. कडा येथील धोंडे महाविद्यालयात बी.एस्सी. चे शिक्षण त्याने घेतले आहे . नगरच्या प्रा.अमोल सायंबर यांच्या मास्टरमाईंड अकॅडमी मधून पोलीस भरतीचे प्रशिक्षण घेतले.मुंबई पोलीस दलात त्याची निवड झाली आहे.याच गावातील गणेश म्हातारदेव गर्जे याने मोठ्या चिकाटीने सहा वर्ष पोलीस भरतीची तयारी केली.नवीमुंबई पोलीस दलात पोलीस कॉन्स्टेबल या पदावर त्याची निवड झाली आहे.आपल्या या यशामध्ये मीरा भाईंदर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले आपले मामा बाळू गर्जे यांचे सततचे प्रोत्साहन आणि मार्गदर्शन यामुळेच आपण हे यश मिळू शकलो असे गणेश याने सांगितले.




0 टिप्पण्या