आष्टी येथील बस स्थानकात बसमध्ये चढत असतांना एका महिलेचे सात तोळ्याचे गंटन चोरट्यानी भरदुपारी दि.१८ मे रोजी लंपास केले होते.आष्टी शहरातील प्राध्यापक काॅलनीत राहणारे माजी प्राचार्य व्ही.एल.शिंदे हे त्यांच्या पत्नीला पुणे येथे जाणाऱ्या बसमध्ये बसुन देण्यासाठी आष्टी येथिल बस स्थानकावर आले होते.पुण्याकडे जाणाऱ्या बस मध्ये चढत असतांना प्राचार्य शिंदे यांच्या पत्नीच्या गळ्यातील सात तोळ्याचे गंटन चोरट्यानी तोडले. परंतु गंटन तुटून शिंदे यांच्या पत्नीच्या हातावर पडल्याचे सह प्रवाशाने त्यांच्या लक्षात आणुन दिले. गंटन तुटल्याचे पाहुन शिंदे पती पत्नी बसमधुन खाली उतरले. दरम्यान शिंदे यांच्या पत्नीने तुटलेले गंटन शिंदे यांच्याकडे खिशात ठेवण्यासाठी दिले.शिंदे यांनी तुटलेले गंटन आपल्या पॅटच्या पुढच्या खिशात ठेवले व पुन्हा दुसर्या बसमध्ये पुण्याला जाण्यासाठी चढत होते. त्यावेळी चोरट्यानी शिंदे यांच्या पॅटेचा खिसा कापुन ते गंटन चोरट्यांनी चोरून नेले.आष्टी बसस्थानकावर महिलांच्या गळ्यातील सोने चोरी करणारे चोर स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहेत.
दि.१८ मे रोजी दुपारी फिर्यादी विजया विश्वनाथ शिंदे (वय ६९) व्यवसाय घरकाम रा.प्राध्यापक कॉलनी मुर्शदपुर (आष्टी) या आष्टी बसस्थानक येथे बसची वाट पाहत उभे असताना दोन चोरटयांनी त्यांच्या गळयातील सोन्याचे गंठण चोरले वगैरे मजकुराची फिर्यादवरून पो.स्टे. आष्टी गुरनं २०३/२०२३ क.३९२,३४ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.या चोरीची घटना गंभीरतेने घेवून बीडचे पोलीस अधीक्षक यांनी वरील घटनेतील आरोपींना तात्काळ जेरबंद करुन गुन्हा उघडकीस आणणे बाबत आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते.या गुन्हयाचे अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्था.गु.शा बीड यांचे मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा चे पथकाने घटनास्थळी भेट देवून आरोपी व गेलेल्या मालाचा शोध घेत असतांना पोलीस निरिक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की. सदरचा गुन्हा गणेश दिनकर झिजुॆ॔डे आणि किशोर भाऊसाहेब शेळके (रा.पाथर्डी) यांनी केला आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यावरुन दि. २४ मे रोजी हे आरोपी हे कोल्हापुर येथे असल्याची माहिती मिळाल्यावरुन तपास पथक हे कोल्हापुर येथे गेले असता आरोपींना पोलीस मागावर असल्याचासंशय आल्याने ते कराड,सातारा,कल्याण येथे जाऊन अहमदनगर ते कल्याण रोडवर माळशेज घाटामधे बंद असलेल्या हॉटेलबाहेर असल्याचीमाहिती मिळाल्यावरुन याठिकाणी जाऊन आरोपींना ताब्यात घेऊन त्यानां विश्वासात घेऊन विचारपुस केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. आरोपी गणेश झिजुॆ॔डे (वय ३२) वर्ष रा.भगवान नगर पाथर्डी आणि किशोर शेळके (वय २०) रा.खेड ता.पाथर्डी यास पो.स्टे.आष्टी गुन्ह्यातील तपास कामी पो.स्टे.आष्टी यांचे ताब्यात दिले आहे.पुढील तपास पो.स्टे.आष्टी आणि स्था.गु.शा.चे पथक करीत आहे. आरोपी यांच्याकडुन अशा प्रकारचे आणखीनगुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
ही कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक सतिष वाघ,पो.उप.नि भगतसिंग दुलत,पो.हे मनोज वाघ,प्रसाद कदम,पो.ना.सोमनाथ गायकवाड,विकास वाघमारे,सलिम शेख,विकी सुरवसे,अशोक कदम सर्व स्थानिक गुन्हे शाखा बीड यांनी केलेली आहे.

0 टिप्पण्या