आष्टी तालुक्यातील टाकळसिंग येथील जि.प.शाळेयातील २९ वर्षापुर्वीच्या विद्यार्थीचा स्नेहमेळावा नुकताच संपन्न झाला. सन १९९३-१९९४ च्या इयत्ता १० वी. चे विद्यार्थी - विद्यार्थिनी यांनी सहभाग घेतला.स्नेहमेळाव्यात अनेकांचे भाषणे झाली.२९ वर्षानंतर विद्यार्थी या मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र आल्यामुळे अनेक आठवणींना उजाळा मिळाला.गुरु व विद्यार्थ्यांंना आपला सेवाकाळ आठवला.विद्यार्थ्यांना आपलं बालपण आठवल्यने मन हेलावून गेले.विद्यार्थी आणि शिक्षक अनेक वर्षानंतर भेटण्याचा आनंद,शब्दांना वाट मोकळी करता आली.स्नेहमेळावाचा योग वर्षातून एकदा का होईना यावा अशी भावना प्रत्येकाने व्यक्त केली.दोस्ताना चित्रपटातील
ओ खाबो के दिन,
ओ..किताबो के दिन,
सवालों की राते,
जवाबो के दिन,
कई साल हमने गुजारे यहा,
यही साथ खेले,हुए हम जवा,
था बचपन बडा आशिकाना हमारा.
या गीतांची आठवण माजी विद्यार्थी या नात्याने करून गेले.आठवणीनी सर्व विद्यार्थी,मित्र,भारावुन गेले होते.आष्टी तालुक्यातील टाकळसिंग शाळेच्या सन १९९३-१९९४ सालच्या १० वी.बॅचच्या विद्यार्थ्यांचा मेळावा आणि स्नेहमिलन झाले.तब्बल २९ वर्षाने विद्यार्थी पुन्हा एकत्र आले होते. सन १९९४ च्या. दहावीच्या बॅचचे स्नेहसंमेलन पार पडले.आपण दरवर्षी क्लासमेंटांचे गेट टुगेदर करुया असे सुधीर जगताप यांनी यावेळी जाहिर केले.कार्यक्रमाच्या प्रारंभी जे आपल्या ग्रुपमध्ये होते.ज्यांचे निधन झाले आहे.या मित्र मैत्रीणांना भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण केली.टाकळसिंगच्या १९९३-१९९४ साली दहावीच्या बॕचमधील विद्यार्थी आणि पुढील आयुष्यामध्ये वेगवेगळ्या वाटेने गेलेले सर्व मित्र मंडळी (माजी विद्यार्थी)मेळाव्याच्या निमित्ताने २९ वर्षांनी पुन्हा एकत्र आले होते.आनंद,स्नेह,कौतुक अशा संमिश्र भावना सवंगड्याच्या चेहऱ्यावर दिसत होत्या.२९ वर्षांनी एकमेकांना भेटणाऱ्या मित्राच्या चेह-यावर उत्सुकता,आनंद,मस्ती अशा संमिश्र भावना होत्या.यावेळी माजी विद्यार्थ्यांच्यावतीने सत्कार केला.माजी विद्यार्थींनी तत्कालीन गमतीजमती,सुख,दुःख,झालेल्या चुका,मिळालेले यश,मनात राहिलेले शल्य व्यक्त करत कार्यक्रमामध्ये रंगत आणली.२९ वर्षांनी भेटलेल्या मित्र मैत्रिणींनी यापुढेही व्हॉटसॅप,फेसबुक,मोबाईल व प्रत्यक्ष भेटीगाठीच्या माध्यमातून संपर्कात राहण्याचा संकल्प केला.गरजेनुसार शाळेस आवश्यक ती मदत करण्याचे विद्यार्थ्यांंनी मत व्यक्त केले.या गेट-टुगेदर कार्यक्रमाच्या निमित्ताने चाळीसहून अधिक माजी विद्यार्थी,विद्यार्थिनी प्रथमच एकत्र आले होते.दहावी आणि बारावीनंतर म्हणजे तब्बल २९ वर्षाने या सर्व विद्यार्थी मित्रांची पुनर्भेट झाली.यापैकी काहीजण नियमित भेटणारे होते तर अनेकांची दहावी किंवा बारावीतून शाळा,कॉलेज संपल्यानंतर पहिल्यांदाच भेट होत होती.एकमेकांना भेटून ओळख दाखवून जुन्या आठवणींना उजाळा देण्यात सर्व मित्र हरखुन गेले होते.यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात सर्वांनी आपापले मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या या आनंदात त्यांचे तत्कालीन शिक्षक असणारे आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेले नरवडे, देशपांडे आदि शिक्षकांनी मार्गदर्शन करताना आपला आनंद या सर्वांना भेटून द्विगुणित झाल्याची भावना व्यक्त केली.
आष्टी तालुक्यातील जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालयातील सन १९९३-१९९४ दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा जिल्हा परिषद माध्यमिक शाळा येथे २९ वर्षानंतर मोठ्या उत्साहात पार पडला.यावेळी जुन्या आठवणींना उजाळा देत विद्यार्थ्यांनी आपले मनमोकळे केले शाळेतील शिक्षकांच्या आठवणी बरोबरच विद्यार्थ्यांनी २९ वर्षांपूर्वीचे आपले जीवनातील किस्से यावेळी सांगितले.त्यामुळे हा स्नेह मेळावा जरी असला तरी विद्यार्थ्यांना आपण शाळेत आलो असल्याचे जाणवत होते. या दहावी बॅचचे अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वी झालेले आहेत.काही प्रगतशील शेतकरी म्हणून गावांमध्ये कारभार पाहत आहेत. या कार्यक्रमासाठी ६० माजी विद्यार्थी उपस्थित होते.अनेक विद्यार्थ्यांच्या डोळ्यात पाणी तरळले. वीस वर्षानंतर भेटीगाठी झाल्याने एकमेकांना पाहिल्यानंतर गळ्यात गळे घालून भेटले. जुन्या आठवणींना उजाळा देऊन झाल्यानंतर शेवटी स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
सन १९९३-९४ इयत्ता १० वी. माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन मेळावा प्रसंगी उपस्थित मुख्याध्यापक डी.जी.देशपांडे, लक्ष्मण नरवडे सर,बनकर सर,पाथरकर सर,गणगे सर, जगताप सर,कोकणे सर,भणगे सर, शाळेचे मुख्याध्यापक महेश शिंदे, गावातील जेष्ठ नागरिक रंगनाथ जगताप,पांडुरंग कुमकर,बाळासाहेब सुपेकर,आंबादास जगताप,संतोष जगताप सर ,विद्यार्थी, विद्यार्थीनी उपस्थित होते.सूत्रसंचालन सुधीर जगताप यांनी केले.सरस्वतीचे पूजन करण्यात आले.शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले.दुपारी स्नेहभोजनाचा कार्यक्रम झाला.शेवटी पसायदानाने सांगता झाली.या कार्यक्रमासाठी सुधीर जगताप,दत्ता जगताप,अशोक जगताप,संतोष भूकन,डॉ विजय गणगे,कां जेतीलाल ओव्हाळ,छाया नेटके,शबाना सय्यद,जयश्री बक्षी,रविंद्र खेडकर,चंद्रमोहन जाधव यांनी मोलाचे योगदान दिले तर उपस्थितांचे आभार छाया नेटके यांनी मानले.

0 टिप्पण्या