Ticker

6/recent/ticker-posts

मैदाने झाली नाहीशी; सुट्टीतील चिमुकल्यांनी रस्त्यातच खेळ मांडले!

'घराची कळा अंगण सांगते!' अशी एक म्हण आहे. काळाच्या ओघात घरासमोरील आंगणे नाहीसे झाली. तशी गावातील शहरातील खेळाची मैदानेही लुप्त झाले.अशातच उन्हाळी सुट्टीत शाळकरी मुलांनी रस्त्यातच बॅट आणि चेंडूचा खेळ मांडला तर आश्चर्य वाटायला नको! असाच प्रकार आष्टी  शहरात घडला असून गेल्या दोन आठवड्यापासून उन्हाळी सुट्टीचा प्रारंभ झाला आहे. अनेकांनी वेगवेगळ्या ठिकाणी फिरून येण्यात आनंद मानला. अनेकांनी महाबळेश्वर ,कोकण,पश्चिम महाराष्ट्रात सहली काढल्या तसेच लग्न समारंभ विविध वास्तुशांती यातही चिमुकल्यांनी मनसोक्त आनंद घेतला.पण यातून उरलेल्या वेळात शाळकरी चिमुकल्यांनी खेळाकडे लक्षवेध वळवले आता कॉलनीमध्ये खेळाची मैदानीच नाहीशी झाली आहेत तर मग खेळायचे कुठे ? शेवटी या चिमुकल्याने रस्त्यातच बॅट आणि चेंडू घेऊन आपली खेळाची हौस भागवली.दरम्यान,मुलांसाठी विशेषता शहरांमध्ये अनेक मैदानी निर्माण करावीत आणि क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून सशक्त तरुण निर्माण करून राष्ट्र निर्मिती योगदान द्यावे असे मत क्रिडा प्रेमींनी व्यक्त केले आहे.






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या