Ticker

6/recent/ticker-posts

कलेक्टर मुधोळ यांच्या आदेशानुसार मुंडे यांच्या हस्ते लिंबोडीत विहीर पुनर्भरण शुभारंभ

आपल्याला मिळालेल्या पदाचा पुर्णपणे वापर जनहितासाठी शेतकऱ्यांसाठी करायचा असा दृढ निश्चिय बीडच्या जिल्हाधिकारी दिपा मुधोळ यांनी केलेला आहे.भविष्यातील पाण्याचं संकट लक्षात घेवून त्यांनी विहीरींच्या पुनर्भरण कामावर भर दिला आहे.या कामासाठी आता त्या सरसावल्या आहेत. सोमवारी आष्टी तालुक्यातील लिंबोडी येथे त्यांच्या आदेशानुसार महत्त्वकांक्षी विहीर पुनर्भरण योजनेचा आष्टीचे गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे यांच्या हस्ते शुभारंभ झाला अशी माहिती सनदी लेखापाल सरपंच अनिल आंधळे यांनी दिली.यावेळी कोळेकर ,तांत्रिक अधिकारी सुभाष तळेकर , रोजगार सेवक समाधान आंधळे व ग्रामस्थ उपस्थित होते.नैसर्गिक संकटामुळे 
कोणता हंगाम कसा जाईल, आणि त्याचा परिणाम कशाप्रकारे होईल. हे निश्चित सांगता येत नाही.वास्तविक पाहता येणाऱ्या खरीप हंगामात पावसाचे प्रमाण घटणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.त्यामुळेच बीड जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी दिपा मुधोळ ह्या अत्यंत बारकाईने आपल्या जिल्ह्याची काळजी घेत आहेत.भविष्यात जिल्ह्यात पाण्याचे संकट भासू नये.यासाठी त्यांनी पुनर्भरणावर अधिक भर दिला आहे.विहीरींची पाणी पातळी वाढविण्यासाठी पुनर्भरण आवश्यक आहे. त्यामुळेच त्यांनी महसूल,कृषी आणि झेडपीची यंत्रणा कामाला लावलेली आहे.विशेष म्हणजे त्या एवढ्यावरच न थांबता त्यांनी स्वतःफिल्डवर उतरून पुनर्भरणाच्या कामाला काकडहि-यात प्रत्यक्ष सुरवात् केली आहे.आष्टी तालुक्यातील लिंबोडीत विहीर पुनर्भरणाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे.जास्तीतजास्त शेतकऱ्यांनी आपल्या विहीरींचे पुनर्भरण करून घ्यावे असे आवाहन गटविकास अधिकारी मुंडे, सरपंच अनिल आंधळे यांनी 
यावेळी केले .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या