Ticker

6/recent/ticker-posts

बीड जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांसाठी आजपासून मोफत दिव्यांग तपासणी शिबीर

सामाजिक न्याय विभाग आणि गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने बीड जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांच्या सेवेसाठी आज दि.२३ मे पासून संपूर्ण जिल्ह्यात “मोफत दिव्यांग तपासणी शिबीर" आयोजित केले आहे.बीड जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांनी या शिबिरात सहभाग नोंदवावा असे आवाहन दिव्यांग शासकीय निमशासकीय व अधिकारी कर्मचारी संघटनेचे  बीड जिल्हाध्यक्ष सिद्धेश्वर शेंडगे,आष्टी तालुकाध्यक्ष देविदास भवर,तालुका सचिव सुदर्शन घुले यांनी केले आहे. लोकनेते गोपीनाथराव मुंडेसाहेब यांच्या सेवेचा वसा आणि वारसा चालवताना लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांनी त्यांच्या विचारांना अभिप्रेत असलेला जो ‘सेवायज्ञ' गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून प्रज्वलित केला आहे. त्या सेवायज्ञाला तेवत ठेवण्याचा आमचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो.याच प्रयत्नांना आणखी एका उपक्रमाची जोड द्यावी, दुर्लक्षित घटकांच्या उत्थानाचे कार्य सुरू राहावे याकरीता हे मोफत पूर्व तपासणी आणि सहाय्यक साधने वाटप शिबिर आयोजित केले आहे.बीड जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांनी तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा, शिबिरात नोंदणी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे झेरॉक्स स्वरूपात सोबत आणावीत,दि.२३ मे रोजी बीड तालुक्यातील दिव्यांग बांधवांसाठी जिल्हा रुग्णालयात सकाळी ९ ते सांयकाळी ६ पर्यंत शिबीर असणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात शिबीर आयोजित केले आहे.आपण सर्वांनी आपल्या परिसरातील दिव्यांगाना व त्यांच्या परीजनांना या शिबिराची माहिती द्यावी असे आवाहन दिव्यांग शासकीय निमशासकीय व अधिकारी कर्मचारी संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष सिद्धेश्वर शेंडगे,आष्टी तालुकाध्यक्ष देविदास भवर व तालुका सचिव सुदर्शन घुले यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या