व्यायाम आणि वाचनाने युवक
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार साहेब आणि खा.सुप्रियाताई यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक गावात स्पर्धा परीक्षाचे पुस्तके उपलब्ध करून देऊन गावांमध्ये वाचन चळवळ उभा राहावी हीच शरद पवारसाहेबांची इच्छा आहे. तीत इच्छा पूर्ण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस ग्रंथालय सेलच्यावतीने प्रयत्न करण्यात येत असल्याचे मत महाराष्ट्र राज्य ग्रंथालय निवड समितीच्या सदस्या असो. रीताताई बाविस्कर यांनी सांगितले तर आजचा युवक व्यायाम आणि वाचनाकडे वळल्यास तो व्यसनापासून नक्कीच दूर राहील. त्यासाठी गावागावात वाचनालय सुरू राहिली पाहिजेत . या वाचनालयामध्ये वाचन योग्य स्पर्धा परीक्षेला पूरक अशी पुस्तके उपलब्ध करून देणे हे लोकप्रतिनिधीचे काम आहे.व्यायाम आणि वाचनाने युवक व्यसनापासून दूर राहतोतर आजचा युवक व्यायामाकडे व वाचनाकडे वळल्यास तो व्यसनापासून नक्कीच दूर राहील असे प्रतिपादन आ.बाळासाहेब आजबे यांनी सांगितले.
आमदार बाळासाहेब आजबे यांचे संपर्क कार्यालयात महाराष्ट्र राज्य ग्रंथालय निवड समितीच्या सदस्या रीताताई बाविस्कर, आ.बाळासाहेब आजबे,बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. शिवाजी राऊत,तालुकाध्यक्ष अण्णासाहेब चौधरी,रामभाऊ खाडे, काकासाहेब शिंदे, हरिभाऊ दहातोंडे, संदीप सुंबरे, युवक तालुकाध्यक्ष भाऊसाहेब घुले , माजेदभाई शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत मतदार संघातील ३८ वाचनालयाला प्रत्येकी 70 पुस्तकांचा स्पर्धा परीक्षा संच वितरित करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून रीताताई बाविस्कर या बोलत होत्या यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, खासदार शरद पवारसाहेब यांनाच वाचनाची आवड असल्याने त्यांनी ही चळवळ उभी केली आहे वाचनाने लोक ज्ञानवंत होतात आणि ज्ञानी माणूस कधीही वाईट काम करत नाही म्हणून प्रत्येक घराघरात वाचन चळवळ उभी राहावी यासाठी राष्ट्रवादी ग्रंथालय सेल हा प्रामुख्याने प्रयत्न करत आहे त्यासाठीच खा.पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार बाळासाहेब आजबे काका यांच्या स्थानिक विकास निधीतून ११ लक्ष ४० हजार रुपये किमतीची स्पर्धा परीक्षा संच ३८ वाचनालयाला वाटप करण्यात आली आहेत यातून उद्याची नवी पिढी घडण्यास मदत होणार आहे ग्रामीण भागातील युवक त्यामुळे प्रशासकीय सेवेत दिसणार आहे असे मत यावेळी त्यांनी सांगितले.आ.बाळासाहेब आजबे म्हणाले की ,माझ्या मतदार संघातील गावागावात वाचनालय चळवळ सुरू करून या वाचनालयामध्ये गावातील युवक या ठिकाणी अभ्यास करताना दिसला पाहिजे तो धाब्यावर जाण्याऐवजी व्यायाम शाळा आणि वाचनालय मध्ये गेला पाहिजे तरच आता समाज सुधारेल येणारी पिढी ही नक्कीच बदल घडवेल त्यासाठी आपण या अगोदरही गावांमध्ये व्यायामशाळा ओपन जिम आणि आता प्रत्येक वाचनालयामध्ये स्पर्धा परीक्षा उपयुक्त अशी पुस्तके देण्याचा उपक्रम राबवला आहे यापुढे प्रत्येक वर्षी आपण वाचनालयासाठी पुस्तके देणार असून त्यासाठी राखीव निधी ठेवणार असल्याचे आश्वासन आ. बाळासाहेब आजबे यांनी मतदारसंघातील वाचनालय संघटनाच्या प्रतिनिधींना दिले, युवक हा व्यायाम आणि वाचनाकडे वळला तरच तो व्यसनापासून लांब राहू शकतो त्यामुळे व्यायाम शाळा ओपन जिम आणि वाचनालय याकडे गावातील जेष्ठ मंडळीनी ही लक्ष देणे गरजेचे आहे यासाठी लागणारी सर्व सुविधा आपण देण्यास तयार असल्याचे आ. बाळासाहेब आजबे यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमासाठी नगरसेवक नाजीम शेख ,विठ्ठल नागरगोजे, अर्जुन काकडे, शामराव फसले, वाचनालयाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काकासाहेब शिंदे यांनी तर आभार डॉ.शिवाजी राऊत यांनी मानले.



0 टिप्पण्या