Ticker

6/recent/ticker-posts

सरपंच परिषद मुंबई,रयत क्रांक्ती संघटना,शेतकरी,उस वाहतुकदार यांची पदयात्रा सुरू...




महाराष्ट्र सरपंच परिषद मुंबई,रयत क्रांक्ती संघटना आणि शेतकरी,स वाहतुकदार यांची कराड ते सातारा अशी पदयात्रा आज सोमवार दि.२२ मे रोजी पासुन सुरु झाली आहे.विविध मागण्यासाठी सोमवार दि. २२  मे २०२३ रोजी कराड ते सातारा पदयात्रा आणि सातारा ते मुंबई मंत्रालयावर मोर्चा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष  दत्ताभाऊ काकडे यांनी दिली.प्रदेशाध्यक्ष काकडे म्हणाले की,आम्ही राज्यातील सरपंच परिषद,रयत क्रांती संघटना, शेतकरी आणि उस वाहतूकदार यांच्या काही मागण्या करत आहोत. त्या तातडीने मान्य होणे गरजेचे आहे.स्वातंत्र्याला ७५ वर्षे पुर्ण झाली परंतु अनेक शेतकरी विरोधी कायदे आस्तित्वात आहेत.त्यामुळे शेती विकासाला आणि शेतक-यांच्या आर्थिक प्रगतीला खीळ बसत आहे.त्यामुळे गावगाड्यातील शेतकरी आत्महत्या करत आहेत. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षामध्येतरी शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य द्यावे.कारण आजही  भारतामध्ये 
६० टक्के शेतकरी शेतीवर अवलंबून आहेत. याच व्यावसायातून 
जवळपास ५० टक्के रोजगार निर्मितीसुध्दा होत आहे.गावगाडा 
चालविताना ग्रामपंचायतीना मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत.
गावचा विकास होण्यापेक्षा अनेक गावे बकाल बनत चालली आहेत.
ही बाब लक्षात घेता सरपंच परिषदेने अनेकवेळा निवेदने देऊन त्यात 
काही मागण्या केल्या मात्र त्यावर काहीच निर्णय झाले नाहीत. त्यामुळे 
आम्ही सरपंच परिषद मुंबई, महाराष्ट्र रयत क्रांती संघटना आणि राज्य 
 वाहतूक संघटना एकत्रीतपणे खालील मागण्या करीत आहोत  
असे सांगितले.पदयात्रेत सदाभाऊ खोत, दत्ताभाऊ काकडे,संजय बापु 
जगदाळे, आदि पदाधिकारी,हजारो सरपंच सहभागी झाले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या