आष्टी तालुक्यातील कडा येथील आनंदराव धोंडे उर्फ बाबाजी महाविद्यालयाची 'नॅक' संस्था बंगळुरूयांच्या पिअर टीमकडून नुकतीच तपासणी करण्यात आली होती.त्यानंतर महाविद्यालयास नॅककडून 'ए' प्लस ग्रेड देण्यात आला आहे.ग्रामीण भागातील नॅकचा ए प्लस दर्जा प्राप्त करणारे आनंदराव धोंडे महाविद्यालयात हे बहुदा राज्यातील एकमेव महाविद्यालय असेल.विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार वरिष्ठ महाविद्यालयांना नॅक तपासणी करून घेणे बंधनकारक आहे.आनंदराव धोंडे महाविद्यालयाने यापूर्वी दोन सायकल पूर्ण केल्या होत्या. तिसऱ्या सायकलची तपासणी कमिटी चेअरमन छत्तीसगडच्या सरगुजा अंबिकापूर येथील संत गहिरा गुरू केंद्रीय विद्यापीठाचे कुलगुरू प्रोफसर अशोक सिंग,कर्नाटकमधील श्रीनिवास इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड कॉमर्सचे प्रोफेसर सुरेशरमणमय्या आणि चेन्नई येथील गुरुनानक कॉलेज येथील प्राचार्य डॉ. सेल्वराज मारी यांच्या समितीने केली. लंचऑन मीटिंगला संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार भीमराव धोंडे, संचालक डॉ. अजय धोंडे,विद्यापीठ प्रतिनिधी सय्यद अझरुद्दीन,राजाबापू नलावडे,अभयराजे धोंडे, जयंत देशमुख,विद्यार्थी प्रतिनिधी , प्राचार्य डॉ.हरिदास विधाते ,नॅक समन्वयक हे उपस्थित होते.या महाविद्यालयाने दत्तक घेतलेल्या आदर्श गाव सराटेवडगाव - आनंदवाडीला भेट देऊन श्रमदानातुन केलेल्या कामांची पाहाणी केली.
आनंदराव धोंडे उर्फ बाबाजी महाविद्यालयात या बाबीची केली तपासणी..............................
- भौतिक सुविधा,
- अध्ययन व अध्यापन कार्यपद्धती,
- संशोधन,
- सुसज्ज ग्रंथालयवाचनकक्ष,
- नावीन्यपूर्ण उपक्रम,
- महाविद्यालयाचा सामाजिक सहभाग,
- विद्यार्थी गुणवत्ता,
- महाविद्यालय व्यवस्थापन
- विद्यार्थ्यांसाठी असणारे लिफ्ट,
- खेळाची साधने,
- क्रीडांगण,
- संगणक लॅब,
- विज्ञान प्रयोगशाळा,
- भाषा प्रयोगशाळा,
- क्लासरूम,
- व्हर्चुअल क्लासरूम,
- स्टुडिओ, होस्टेल,
- स्वच्छतागृहे,
- वनस्पती उद्यान,
- अटल आनंद घनवन,
- रेनवॉटर हार्वेस्टिंग,
- सोलर सिस्टीम,
- वृक्षलागवड,
- पार्किंग व्यवस्था,
- उपहारगृह,
- जीम व योगा सेंटरची सर्व पाहणी केली.

0 टिप्पण्या