Ticker

6/recent/ticker-posts

नाविन्यपूर्ण खेळ खेळल्यामुळे आत्मविश्वास, सहनशीलता,खिलाडू वृत्ती वाढते --- जेष्ठ पत्रकार उत्तम बोडखे


समर कॅम्प अभ्यासासोबत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी फायद्याचा ठरतो,मोबाईल पाहण्यापासून मुले दुर राहतात. यादरम्यान झालेल्या योगा,डान्स प्रशिक्षण यामुळे शारीरिक व्यायाम झाला.मनाची एकाग्रता वाढली,अबॅकसमुळे गणिते जलद सोडवण्याची पद्धत माहीत झाली अबॅकस लाड मॅडमने घेतले.पेपर ,चिखलापासून गोष्टी बनवताना बौद्धिक कौशल्य वाढण्यासाठी चालना मिळाली.पाल्यापासून आणि दाळीपासून वस्तूबनवणे अशा सर्व काही गोष्टींमध्ये विद्यार्थ्यांची कल्पकता वाढली,विरंगळाआणि मनोरंजनासाठी रेनडान्स,बोटिंग,रोपवे,जम्पिंग,स्विमिंग,अंबेश्वर कृषी वन पर्यटन,अंभोरा येथे ट्रिप नेण्यात आली.नाविन्यपूर्ण खेळ खेळल्यामुळे आत्मविश्वास,सहनशीलता,खिलाडू वृत्ती वाढते असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार उत्तम बोडखे यांनी केले
           समर कॅम्प घेणारी आष्टीतील सियाज् प्रिस्कूल ही एकमेव शाळा आहे.या द्वितीय समर कॅम्पचा समारोप रविवार दि.२१ मे २०२३ रोजी सायंकाळी  आयोजित करण्यात आला होता.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जेष्ठ पत्रकार उत्तमर बोडखे तर प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ साहित्यिक बाळासाहेब देशमुख,पत्रकार सचिन रानडे,पत्रकार प्रवीण पोकळे उपस्थित होते. हा समर कॅम्प दोन ग्रुपमध्ये घेतला गेला. (१६ ते ३० एप्रिल आणि 
५ ते २० मे ) अशी माहिती संचालक सचिन विधाते यांनी दिली.या कॅम्पमध्ये वेगवेगळे उपक्रम राबवले गेले,हस्तकला,वर्गातील  उपक्रम,वर्गाबाहेरीलउपक्रम,शैक्षणिक उपक्रम.हस्तकलामध्ये 
पेपरपासून वेगवेगळ्या गोष्टी बनवल्या जातात.मांजर,इंद्रधनुष्य,चंद्र तारे,गुलाबाचे फुल आदी वेगवेगळ्या प्रकारच्या दाळी वापरून चित्र 
बनवण्यात आले. त्याचबरोबर फ्रेंडशिप बँड बनविणे,पवनचक्की बनविणे अशा अनेक गोष्टी शिकवले गेले.चिखलापासून किल्ला फळे किंवा इतर गोष्टी बनविणे व त्यांना रंग देणे इत्यादी. वर्गातील उपक्रमामध्ये डोळ्याला पट्टी 
बांधून चित्र काढणे, दोरीवरून चालणे,झाडाच्या पाल्यापासून चित्र बनविणे ,फुगे वापरून वेगवेगळे खेळ,बॉल वापरून वेगवेगळे खेळ,पायात पोतं 
घालून चालणे,पाय बांधून चालणे, संगीत खुर्ची, हुल्लाहूप,वर्गबाहेर विद्यार्थ्यांसाठी स्विमिंग,फॅशन शो,योगा ,लांब उडी,उंच उडी, अडथळा उडी ,रेन डान्स ,जीप लाईन, सिस्वॉ,  जम्पिंग,स्विंग,डान्सपार्टी,लपाछपी,मॅच,लंगडी पाणी,खो-खो दोरीचा वापर करून वेगवेगळे खेळ, संस्कृत श्लोक घेतले जात होते. शैक्षणिक उपक्रमामध्ये अबॅकस, वर्ड पझल ,रस्ता सापडणे , विज्ञान प्रयोग, विविध देशांची आणि घटक राज्यांची नावे माहीत करणे, चित्र रंगवणे,लेझर लाईटचा वापर करून अक्षर ओळखणे, प्राण्यांचे आवाज 
काढणे ओळखणे व तसे चालणे अशा अनेक गोष्टी शैक्षणिक उपक्रमामध्ये घेतल्या गेल्या. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचा उच्च प्रशिक्षित शिक्षक अभय सर  यांनी डान्स क्लास घेतला. काही विद्यार्थी समर कॅम्पला प्रवेश घेताना पालकांच्या असे म्हणणे होते की विद्यार्थी थोडा बुजून राहतो परंतु कॅम्पला आल्याच्या नंतर विद्यार्थ्यांमध्ये भरपूर आत्मविश्वास वाढला व सर्व घेण्यात येणाऱ्या ऍक्टिव्हिटीमध्ये तो सहभागी होऊ लागला. हे सर्व शाळेतील शिक्षिका सौ.नंदिता गायकवाड,सौ.सुवर्णा गाडेकर,सौ.मोनाली शिंदे,सौ.संध्या तोडकर ,
सौ.मनीषा सोंडगे ,सौ.सुरेखा जाधव,सौ.देशमुख मॅडम आणि ‌महेश तोडकर यांच्या सहकार्याने शक्य झाले प्रत्येक स्टाफ स्वतःहून विद्यार्थी होऊन विद्यार्थ्यांमध्ये मिळून मिसळून ऍक्टिव्हिटी करून घेत होता प्रत्येक दिवशी वेगवेगळे प्लॅन आणि रोजची कामे व घेण्यात येणाऱ्या सर्व ऍक्टिव्हिटी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.प्रियंका सचिन विधाते यांच्या नियोजनामुळे 
शक्य झाले प्रत्येक विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा पाहण्यासारखा होता 
ते फक्त आष्टी शहरातील समर कॅम्प राबवणाऱ्या सियाज् प्रिस्कूल शाळेमुळे शक्य झाले.पालक, नातेवाईकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
सांस्कृतिक कार्यक्रम पाहून प्रेक्षक भारून गेले होते.यावेळी १० गाण्यांवर मुलांनी नृत्य केले.अहमदनगर येथील जेष्ठ साहित्यिक बाळासाहेब देशमुख यांच्या कथा बाईंनी शिकवला धडा व माणुसकीचा धर्म यांनी सर्वांची मने वेधले. प्रा.सचिन विधाते यांनी उपस्थितांचे आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या