'मानवी जीवनात आई-वडिलांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.एकूण व्यवस्थेमध्ये आपली काळजी घेणारा,आपल्या सुखात दुःखात हृदयापासून सहभागी होत खऱ्या अर्थाने सावली देणारा एकमेव आई-वडील हा घटक आहे.याचे भान ठेवून 'तुम्ही जीवनात कितीही मोठे व्हा पण आई-वडिलांना कदापि विसरू नका!' असा मौलिक सल्ला जेष्ठ महिला कीर्तनकार ह.भ.प.पुष्पाताई जगताप मुळे महाराज यांनी दिला.आष्टी तालुक्यातील कडा साखर कारखान्याजवळ असलेल्या जोशीवस्ती येथील कै.रामचंद्र दादा गोंडे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आज रविवारी महिला कीर्तनकार ह.भ.प. पुष्पाताई जगताप - मुळे यांची प्रवचन सेवा संपन्न झाली.यावेळी उपस्थित भाविक भक्तांना मार्गदर्शन करताना रामचंद्रदादा यांच्या अनेक आठवणींना उजाळा देत त्यांनी संतांच्या विचारात सामर्थ्य असल्याचे सांगत आई-वडिलांची महती अनेक दृष्टांतातून विशद केले. प्रारंभी आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आयुष्य समर्पित करताना सामाजिक बांधिलकी जपत कर्तव्य निभावणाऱ्या कै.रामचंद्रदादा गोंडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मान्यवरांसह यांनी अभिवादन करण्यात आले.ह.भ.प.पुष्पाताई जगताप महाराज पुढे म्हणाल्या की,मानवी जीवनातील आईवडील ही अत्यंत महत्त्वाची अशी संस्कार केंद्र आहेत.प्रत्येकाच्या जीवनात आई-वडिलांचे स्थान अनिवार्य असून त्यांच्या ज्ञानाच्या मार्गदर्शनाच्या आणि संस्काराच्या शिदोरीवरच त्याची दिशा ठरत असते.आपल्या मुलाने मोठे व्हावे असे फक्त आई-वडिलांना वाटते आपल्या भल्यासाठी जगाला काही देणे घेणे नाही सुख दुःख आपण मोठे व्हावे त्यात आनंद मानणारे फक्त माता-पिता असतात आणि म्हणून ही जाणीव आणि संवेदना ठेवून प्रत्येकाने वाटचाल करावी असे सांगत त्यांनी अध्यात्मातील अनेक दृष्टांत दिले.सकाळी प्रत्येकाने आपल्या आई-वडिलांचे नतमस्तक होऊन आशीर्वाद घ्यावेत.दिवसाची सुरुवात आई-वडिलांच्या दर्शनाने करावी असा मौलिक उपदेश करत ह.भ.प.पुष्पाताई जगताप- मुळे यांनी सांगितले.महाराष्ट्राला संतांची मोठी परंपरा आहे.मानवी जीवन संस्कार संपन्न करण्याची खरी कुवत आपल्या राज्याची आहे.या राज्याने देशाला एक पुरोगामी संस्काराचा आदर्श घालून दिल्याचे त्यांनी सांगितले.सुखाच्या प्राप्तीसाठी अध्यात्म आवश्यक असून अध्यात्मात आई-वडिलांच्या संस्कारक्षम मार्गदर्शनाचा जागोजागी उल्लेख असल्याचे अनेक दृष्टांत त्यांनी सांगत तुम्ही जीवनात कितीही मोठे व्हा पण आई-वडिलांना विसरू नका त्यांची सेवा करण्यात धन्यता माना असे आवाहन ह.भ.प. जगताप महाराज यांनी शेवटी केले.कै.रामचंद्रदादा गोंडे यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने महराजांनी त्यांच्या मुलांनी त्यांची केलेली सेवा संस्कार हे त्यांचे फोर मोठे भाग्य आहे याचा आदर्श घेत प्रत्येकाने आनंदी सुखी कुटुंबासाठी आई-वडील आणि अध्यात्म सेवा करावी असे त्या म्हणाल्या.रामचंद्रदादांच्या या द्वितीय पुण्यतिथीच्या निमित्ताने प्रवचन सेवेला नामधारक संत आसाराम महाराज केळसांगवीकर ,माजी आ.भीमराव धोंडे,देविदास धस,सुनिल रेडेकर,संतोषभैय्या चव्हाण,पत्रकार उत्तम बोडखे,उमेश जगताप,ताराचंद कानडे,पैलवान बबन माने,प्रा.महेश चवरे,सरपंच पोपटराव गोंडे,जालुशेठ गोंडे,नवीनशेठ गोंडे ,हरिशेठ गोंडे,आष्टी तालुक्यातील विविध गावांचे पदाधिकारी आणि परिसरातील ज्येष्ठ नागरिक महिला भगिनी,तरुण युवक यांच्यासह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
--------------------------------------

0 टिप्पण्या