Ticker

6/recent/ticker-posts

आष्टी येथील सियाज् प्रि स्कूल यांच्या द्वितीय समर कॅम्पचाआज समारोप समारंभ

 







आष्टी शहरात समर कॅम्प राबवणारी एकमेव शाळा सियाज् प्रिस्कूल यांचा यशस्वी द्वितीय समर कॅम्पचा समारोप समारंभ रविवार दि.२१ मे रोजी सायं. आयोजित करण्यात आला आहे. हा समर कॅम्प दोन ग्रुपमध्ये घेतला गेला. (१६ ते ३० एप्रिल आणि ५ ते २० मे ) अशी माहिती संचालक सचिन विधाते यांनी दिली.विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी समर कॅम्पचा फायद्याचा होतो.मोबाईल पाहण्यापासून मुले दुर राहतात.यादरम्यान झालेल्या योगा,डान्स प्रशिक्षण यामुळे शारीरिक व्यायाम झाला ,मनाची एकाग्रता वाढली, अबॅकसमुळे गणिते जलद सोडवण्याची पद्धत माहीती होती. अबॅकस शिक्षिका लाड यांनी घेतले.पेपर किंवा चिखलापासून गोष्टी बनवताना बौद्धिक कौशल्य वाढण्यासाठी चालना  मिळाली.पाल्यापासून आणि दाळीपासून वस्तू बनवणे अशा सर्व काही गोष्टींमध्ये विद्यार्थ्यांची कल्पकता वाढली गेली, विरंगळा आणि मनोरंजनासाठी रेन डान्स,बोटिंग,रोप वे, जम्पिंग,स्विमिंग, अंबेश्वर कृषी वन पर्यटन, अंभोरा येथे ट्रिप नेण्यात आली.नाविन्यपूर्ण खेळ खेळल्यामुळे त्याच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला तसेच संघर्ष करण्याची क्षमता वाढते सहनशीलता, खिलाडू वृत्ती वाढली.या कॅम्पमध्ये वेगवेगळे उपक्रम राबवले गेले. हस्तकला, वर्गातील उपक्रम,वर्गाबाहेरील उपक्रम,शैक्षणिक उपक्रम.हस्तकलामध्ये पेपर पासून वेगवेगळ्या गोष्टी बनवल्या जातात. मांजर,इंद्रधनुष्य,चंद्र तारे,गुलाबाचे फुल इत्यादी वेगवेगळ्या प्रकारच्या दाळी वापरून चित्र बनवण्यात आले.त्याचबरोबर फ्रेंडशिप बँड बनविणे,पवनचक्की बनविणे अशा अनेक गोष्टी शिकवले गेले.चिखलापासून किल्ला फळे किंवा इतर गोष्टी बनविणे व त्यांना रंग देणे वर्गातील उपक्रमामध्ये डोळ्याला पट्टी बांधून चित्र काढणे, दोरीवरून चालणे, झाडाच्या पाल्यापासून चित्र बनविणे,फुगे वापरून वेगवेगळे खेळ, बॉल वापरून वेगवेगळे खेळ,पायात पोतं घालून चालणे,पाय बांधून चालणे, संगीत खुर्ची, हुल्लाहूप. वर्गबाहेर विद्यार्थ्यांसाठी स्विमिंग, फॅशन शो, योगा ,लांब उडी,उंच उडी, अडथळा उडी,रेन डान्स ,जीप लाईन, सिस्वॉ,  जम्पिंग, स्विंग, डान्स पार्टी, लपाछपी ,मॅच, लंगडी पाणी,खो-खो दोरीचा वापर करून वेगवेगळे खेळ, संस्कृत श्लोक घेतले जात होते. शैक्षणिक उपक्रमामध्ये अबॅकस, वर्ड पझल ,रस्ता सापडणे , विज्ञान प्रयोग, विविध देशांची  आणि घटक राज्यांची नावे माहीत करणे, चित्र रंगवणे,लेझर लाईटचा वापर करून अक्षर ओळखणे, प्राण्यांचे आवाज काढणे ओळखणे व तसे चालणे अशा अनेक गोष्टी शैक्षणिक उपक्रमामध्ये घेतल्या गेल्या. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचा उच्च प्रशिक्षित शिक्षक अभय सर  यांनी डान्स क्लास घेतला. काही विद्यार्थी समर कॅम्पला प्रवेश घेताना पालकांच्या असे म्हणणे होते की विद्यार्थी थोडा बुजून राहतो परंतु कॅम्पला आल्याच्या नंतर विद्यार्थ्यांमध्ये भरपूर आत्मविश्वास वाढला व सर्व घेण्यात येणाऱ्या ऍक्टिव्हिटी मध्ये तो सहभागी होऊ लागला हे सर्व शाळेतील शिक्षिका  सौ नंदिता गायकवाड, सौ सुवर्णा गाडेकर ,सौ मोनाली शिंदे, सौ संध्या तोडकर ,सौ मनीषा सोंडगे ,सौ सुरेखा जाधव, सौ. देशमुख आणि ‌महेश तोडकर सर यांच्या सहकार्याने शक्य झाले प्रत्येक स्टाफ स्वतःहून विद्यार्थी होऊन विद्यार्थ्यांमध्ये मिळून मिसळून ऍक्टिव्हिटी करून घेत होता प्रत्येक दिवशी वेगवेगळे प्लॅन आणि रोजची कामे व घेण्यात येणाऱ्या सर्व ऍक्टिव्हिटी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. प्रियंका सचिन विधाते यांच्या नियोजनामुळे शक्य झाले प्रत्येक विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा पाहण्यासारखा होता ते फक्त आष्टी शहरातील समर कॅम्प राबवणाऱ्या सियाज् प्रिस्कूल शाळेमुळे शक्य झाले तरी या समर कॅम्पचा समारोप समारंभ रविवार दि. २१ मे  २०२३ रोजी सायंकाळी ५:३० ला आयोजित करण्यात आला आहे.सर्व पालकांची तसेच नातेवाईक आप्तेष्टांची उपस्थिती प्रार्थनीय आहे . कार्यक्रमाचा समारोप समारंभ सांस्कृतिक कार्यक्रम तसेच अहमदनगर येथील जेष्ठ साहित्यिक बाबासाहेब देशमुख यांच्या कथा कथन बाईंनी शिकवला धडा,  माणुसकीचा धर्म, सियाज् प्री स्कूल,आष्टी येथे आयोजित करण्यात आला आहे. सर्वांनी अवश्य उपस्थित रहावे असे आवाहन प्रा.सचिन विधाते यांनी केले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या