Ticker

6/recent/ticker-posts

ज्येष्ठांच्या मार्गदर्शनातून वाटचाल करणारे तरुण,गुणी झुंजार संपादक अजितदादा वरपे.....




   समाजाचा महत्त्वाचा अंग असलेल्या शेतकरी,शेतमजूर, वंचित घटकांच्या जीवनाचा वास्तव वेध घेणारे आणि बीड जिल्ह्याच्या आत्म्याचा आवाज बनलेले लोकप्रिय दैनिक झुंजारनेताचे संपादक पदावर कार्य करताना समाज घटकातील बुद्धीवादी लोकशाही क्षेत्रातील महत्त्वाचा घटक ठरलेले ज्येष्ठ पत्रकार बांधवांच्या मार्गदर्शन व विचार विनिमयातून वाटचाल करणारे झुंजार संपादक अजित वरपे यांचा वाढदिवस.. अजित वरपे हे दैनिक झुंजारनेताला उज्ज्वल दीपस्तंभकडे नेणारा सरसेनापती आहे.सर्वसामान्य माणसांच्या जीवनाला उपयुक्त ठरेल अशी अनुकूल भाषा प्रत्यक्ष जीवन व्यवहारांमध्ये वाटणारे सजीव संवाद हे झुंजारनेताच्या लेखणीचे वैशिष्ट्य ठरलेले आहे.त्यादृष्टीने यातील लेखन विकासाच्या अंगाने घेतलेला वेध असतो.सर्वसामान्य पत्रकार बांधवांच्या विचार विनिमयातून,प्रसंगी जेष्ठ पत्रकारांच्या मार्गदर्शनातून आपल्या दैनिकाची वाटचाल करणारे दैनिक झुंजारनेताचे संपादक अजित वरपे.....

दैनिक झुंजारनेताचे संपादक अजित वरपे यांची वाटचाल झुंजारनेताचे संस्थापक संपादक स्व.मोतीरामजी वरपेदादा यांच्या आशीर्वादाने आणि वाचकांच्या प्रचंड प्रेमामुळे यापुढे ही यशस्वी होईल यात शंका नाही.बीड जिल्ह्याचा बुलंद आवाज आणि मराठवाड्याची धगधगती तोफ दैनिक झुंजारनेताचे युवा संपादक अजितदादा वरपे यांचा आज वाढदिवस....बीड जिल्ह्याच्या मातीतील क्रांतिकारी दैनिक म्हणून नावाजलेल्या दैनिक झुंजारनेताचे संपादक अजित वरपे यांना त्यांच्या आजपर्यंतच्या अत्यंत खडतर आणि यशस्वी कारकिर्दीची शासनाने दखल घेतली आहे.स्व.मोतीरामजी वरपेदादांनी अत्यंत परिश्रम आणि कष्टातून दैनिक झुंजारनेताच्या रोपटे लावले.सातत्य,चिकाटी आणि जिद्दीच्या बळावर साप्ताहिक ते मराठवाडास्तरीय लोकप्रिय दैनिक अशी प्रतिमा निर्माण केलेल्या या दैनिकाने वटवृक्षात रुपांतर केल्यानंतर सदैव सामाजिक भूमिका कायम ठेवली आणि म्हणूनच शहर आणि ग्रामीण भागात सुद्धा दैनिक झुंजारनेताची प्रतिमा आपलेपणाची,स्नेहाची आणि क्रांतिकारी विचारांची म्हणून गणली गेली आहे.स्व. मोतीरामजी दादांच्या अथक परिश्रमातून निर्माण झालेला दैनिक झुंजारनेताचा प्रवास अविरत,अखंड सुरू आहे.रंजल्या- गांजल्या दीनदलित दुबळ्या अनाथ अपंग शेतकरी शेतमजूर आणि वंचित घटक यांचा आवाज बनून झुंजारनेताने सदैव कर्तव्य बजावले.गेल्या काही वर्षांपासून झुंजारनेताच्या संपादकपदाची जबाबदारी संपादक अजितदादा वरपे यांनी अत्यंत समर्थपणे,सक्षमपणे घेतली आणि प्रभावी,यशस्वीरित्या पेललीसुद्धा आणि म्हणूनच बीड जिल्ह्याचा आत्मा आणि मराठवाड्याचा बुलंद आवाज म्हणून झुंजारनेताची प्रतिमा कायम राहीली.बीड जिल्ह्याच्या या पवित्र सुगंधी मातीतील दैनिक झुंजारनेताच्या कार्याची दखल घेणे क्रमप्राप्त ठरते.संपादक अजितदादा वरपे यांचा त्यांच्या वृत्तपत्राच्या सामाजिक,राजकीय, धार्मिक,वैचारिक,सांस्कृतिक ,शैक्षणिक आदीसह विविध क्षेत्रातील कर्तव्य भूमिका आणि गुणवत्तापूर्ण शब्दांकन आणि अर्थपूर्णता म्हणूनच त्यांचा गौरव होतो आहे.आज वाढदिवसानिमिताने झुंजारनेता परिवाराच्यावतीने संपादक अजितदादा वरपे यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा.....



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या