Ticker

6/recent/ticker-posts

माजी आ.साहेबराव दरेकर यांच्या नातवाचा आज सायंकाळी कड्यात शाही थाटात विवाह होणार....

 राजकीय क्षेत्रातील भीष्माचार्य म्हणून समजले जाणारे आष्टी,

पाटोदा,शिरूर विधानसभा मतदार संघाचे माजी आ.साहेबराव दरेकर (नाना) यांचे नातू तसेच बीड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजाभाऊ दरेकर यांचे चिरंजीव ऋषिकेश यांचा विवाह मानूर येथील कारभारी बापू कदम (मामा) यांची नात तर नामदेव कदम यांची चि.सौ.का.कोमल हिच्याशी आज रविवार दि. २१ मे २०२३ रोजी सायंकाळी ७ वाजता आष्टी तालुक्यातील कडा येथील मोतीलाल कोठारी विद्यालयाच्या मैदानावर भव्य दिव्य आणि शाही थाटात विवाह संपन्न होणार आहे.

विशेष म्हणजे या विवाह सोहळ्यासाठी राजकारणातील आजी-माजी मंत्री,खासदार,आमदार विविध संस्थांचे पदाधिकारी,शैक्षणिक, धार्मिक,राजकीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.बीड जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती उद्धवबापू दरेकर यांचे  नवरदेव ऋषिकेश पुतणे आहेत.दरेकर आणि कदम हा विवाह भव्य दिव्य होण्यासाठी दोन्ही परिवारातील सदस्य परिश्रम घेत आहेत.या सोहळ्यात माजी मंत्री शिवाजीराव पंडित,माजी मंत्री आ.सुरेश धस,खा.
प्रीतमताई मुंडे यांच्यासह अहमदनगर जिल्ह्यातील नेते,आमदार,माजी आमदार ,पदाधिकारी तसेच नातेवाईक, हितचिंतक, मित्रपरिवार आणि जनता मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या