आष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांची कामधेनु समजल्या जाणाऱ्या कडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्व संचालकांची अविरोध निवड झाली होती.यामध्ये आ.सुरेश धस,आ.बाळासाहेब आजबे, माजी आ.भीमराव धोंडे यांचे संचालक अविरोध निवडून आले होते.रविवारी झालेल्या सभापतीपदाच्या निवडीत आ. सुरेश धस समर्थक माजी सभापती रमजान तांबोळी यांची सभापतीपदी तर माजी आ.भीमराव धोंडे गटाचे नामदेव धोंडे यांची उपसभापतीपदी अविरोध निवड करण्यात आली.कडा कृषी उत्पन्न बाजार समिती गेल्या अनेक वर्षापासून आ. सुरेश धस यांच्या ताब्यात आहे.बाजार समिती आ. धस यांच्या ताब्यात आल्यापासून शेतकऱ्यांची कामधेनु समजल्या जाणाऱ्या बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत. महाराष्ट्रातील उत्कृष्ट कांदा बाजार समिती पैकी एक असणारी कडा बाजार समितीची निवडणूक देखील मागील महिन्यामध्ये अविरोध पार पडली होती यामध्ये आ.सुरेश धस,माजी आ. भीमराव धोंडे तर आ.बाळासाहेब आजबे व माजी आ. साहेबराव दरेकर यांच्या जागा दिल्या होत्या. आज रविवार १४ मे रोजी निवडणूक निर्णय अधिकारी बाळकृष्ण शिंदे यांनी सभापती, उपसभापती निवडीसाठी एक विशेष सर्वसाधारण सभा बोलावली होती. यामध्ये तांबोळी यांचा सभापतीपदासाठी तर धोंडे यांचा उपसभापती पदासाठी एकमेव अर्ज आल्याने वरील निवडी अविरोध करण्यात आल्या.नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे आ. सुरेश धस ,माजी आ. भीमराव धोंडे सह आदींनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत.यावेळी सर्व संचालक उपस्थित होते.


0 टिप्पण्या