उत्तम बोडखे | आष्टी
सातत्याने अस्थिरता...भारताच्या कट्टर दुष्मनांची विविध स्तरावर व्यापक प्रमाणात समाज हिता विभागाची धोरणे... त्यामुळे भीतीचे वातावरण अशा परिस्थितीत स्वतंत्र्याचा क्षण हा ज्येष्ठांसाठी परमानंदाचा तर तरुणांसाठी तो स्वर्गीय क्षण होता! अशा शब्दात ज्येष्ठ नागरिक तथा आपल्या वयाची ९१ पार केलेल्या गहिनीनाथनाना बोडखे यांनी आठवणींना उजाळा दिला...
आष्टी तालुक्यातील सराटेवडगाव आनंदवाडी हे तालुक्यातील अत्यंत तुंगार कृषीविषयक आवड असलेले आणि सर्व गुणांनी युक्त असे आदर्श ग्राम आहे. माजी सरपंच प्रा. डॉ. राम बोडखे यांच्या संकल्पनेतून या गावच्या विकासासाठी अनेक योजना केल्या.गावची शिस्त, एकोपा आणि गावच्या विकासासाठी सर्वांनी पुढे येणे या वैशिष्ट्यांनी या गावची परंपरा आहे.अशा या आदर्श ग्राम मधील गहिनीनाथ बोडखे हे ९१ वर्षाचे ग्रहस्थ भारताच्या स्वातंत्र्याचे साक्षीदार आहेत. १५ ऑगस्ट १९४७ ला जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा ते अत्यंत तारुण्यात म्हणजे केवळ १५ वर्षाचे होते. ऐन उमेदीचा काळ असल्याने त्यांनी हा क्रांतीकारिक क्षण स्वतः अनुभवल्याचे त्यांच्या बोलण्यातून दिसून आले. त्यांनी त्या काळात अनुभव केलेले कार्य ऐकताना उपस्थितांच्या अंगावर अक्षरशः शहारे येत होते.प्रत्येक तरुणांमध्ये भारत स्वतंत्र होईल या एकच अपेक्षेने प्रचंड चैतन्य उत्स्फूर्तता निर्माण झाली होती. अंगात नवा जोश होता, नवी चेतना होती. स्वातंत्र्याची पहाट येईल ही आशा होती आणि तो क्षण १५ ऑगस्ट १९४७ रूपाने अवतरला आणि सबंध भारत मातेच्या सुपुत्रांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाग्य उजळले,हे सांगताना त्यांचा आत्मविश्वास प्रचंड दूनावला होता.९१ वर्षाचे गहिनीनाथनाना हे सराटेवडगाव - आनंदवाडीचे माजी सरपंच प्रा.डॉ.राम बोडखे यांचे वडील आहेत.यावेळी त्यांनी अनेक किस्से ऐकवले.त्या काळामध्ये विहिरीमध्येमध्ये पोहणे, पहाटे मोट हाकणे,नांगरणी करणे,गवत कापणे, व्यायाम करणे, दूध पिणे,भजन करणे, लग्न वरातीत सॉंग आणणे, लेझीम डाव खेळणे आदि आवडी,छंद जोपासत समाजाच्या हिताच्या गोष्टी करत राष्ट्रधर्म हे आम्ही निभावत होतो. हे त्यांनी प्रकर्षाने सांगितले.यावेळी गहिनीनाथनाना बोडखे,वरिष्ठ पत्रकार उत्तमर बोडखे,इंजि.पी.बी.बोडखे, सेवानिवृत्त पीएसआय शेख अन्सारभाई, प्रा.डा.जी.पी. बोडखे, राजेश बोडखे आदि उपस्थित होते.

0 टिप्पण्या